पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडून आलेल्या आमदारांनी पक्षांतर करू नये म्हणून आधी कॉंग्रेसने आणि आता आम आदमी पार्टीने त्यांच्या उमेदवारांना शपथ घ्यायला लावली. यावर भाष्य करताना गोवा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे बुधवारी म्हणाले, "आम्हाला आमच्या उमेदवारांना कोणतीही शपथ देण्याची गरज नाही. आमचे सरकार (Government) निवडून आल्यावर आमचे आमदार राजभवनात शपथ घेतील." (Goa Election Latest News)
"भाजप बहुमताने निवडून येईल हे सर्व राजकीय पक्षांना माहीत आहे. त्यांना आपण सरकार स्थापन करणार असा विश्वास असता तर त्यांनी आपल्या आमदारांना असे करायला लावले असते का?" असा प्रश्न देखील तानावडे यांनी उपस्थित केला.
"प्रशांत किशोर यांना वाटले की, सर्वत्र तृणमूल कॉंग्रेसचे पोस्टर लावल्याने पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण होईल. पण गोव्याची (Goa) स्थिती वेगळी आहे. ही पोस्टरबाजी (पोस्टर-चालित राजकारण) इथे चालत नाही,” असे तानावडे म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल देखील तानावडे बोलले. गोव्यातील पायाभूत सुविधा, पर्यटन आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळणार आहे. हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासोबतच रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.