Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्याने पाहिली अटीतटीची लढत; 9 उमेदवार एक हजार पेक्षा कमी मतांनी विजयी

राज्यात 20 जागा जिंकलेल्या भाजपचे सहा उमेदवार कमी मताधिक्याने विजयी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यातील काहींना घवघवीत यश मिळाले, तर काही 'काट्यावर पास' झाले. उर्वरीत उमेदवारांच्या वाट्याला निराशा आली.

गोव्यात 40 पैकी 9 मतदारसंघात विजेत्या उमेदवाराचे मताधिक्य एक हजारांपेक्षा कमी आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात 20 जागा जिंकलेल्या भाजपचे सहा उमेदवार कमी मताधिक्याने विजयी झाले आहेत.

फोंडा (Phonda) मतदारसंघात डॉ. केतन भाटीकर यांच्या विरोधात लढणारे रवी नाईक फक्त 77 मतांनी विजयी झाले. पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात आणि अपक्ष उत्पल पर्रीकर यांच्यात देखील अटीतटीची लढत झाली. बाबुश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा 716 मतांनी पराभव केला. मांद्रे मतदारसंघात मगोचे जीत आरोलकर हे 768 मतांनी विजयी झाले. आरजीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी सांत आंद्रे मतदारसंघात बाजी मारली.

प्रियोळमध्ये मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांना चांगली टक्कर दिली. या दोघांमध्ये 213 मतांचा फरक आहे.

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ
गोव्यात 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावेळी भाजपने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 40 जागा लढवल्या होत्या. यातील 20 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT