पेडणेमध्ये मतदारांचे 'नोटा'ला प्राधान्य

गोव्यात 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे.
NOTA
NOTADainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. बहुसंख्य लोकांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मते दिली, तर काहींनी 'नोटा'चे (None of the above) बटन दाबले. मांद्रे मतदारसंघात 261 मते 'नोटा'ला मिळाली, तर पेडणे मतदारसंघात 363 लोकांनी उमेदवारांच्या जागी 'नोटा'ला प्राधान्य दिले.

NOTA
गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात : अरविंद केजरीवाल

मांद्रे (Mandrem) मतदारसंघात एकूण 9 उमेदवार उभे होते. पोस्टल मतदानात दोन मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडल्याची माहिती समोर आली आहे. मांद्रेत 261 मते कुठल्याही उमेदवाराला न मिळता 'नोटा'ला मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या 'नोटा'च्या पर्यायाचा मतदारांनी उपयोग केला, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

NOTA
‘रोजगार’ समस्या निकालात काढू: गोविंद गावडे

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ
गोव्यात 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावेळी भाजपने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 40 जागा लढवल्या होत्या. यातील 20 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com