Dr.Chandrakant Shetye Dr.Chandrakant Shetye X Handle
गोंयची संस्कृताय

Goa Temple: गोव्याच्या गावागावांतील मंदिरे, संस्कृती ही भूषणावह! मंदिरात दडलेल्या असतात लोकांच्या भावना

Goa Culture: आमदार डॉ. शेट्ये यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा व्यक्त करून सर्वांनी भेदभाव विसरून एकोप्याने राहण्याचे आवाहन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

साळ: गावागावांतील मंदिरे आणि संस्कृती ही गावची भूषणे असून सकारात्मक उर्जेतून लोकांच्या भावना या मंदिरात दडलेल्या असतात, त्यातच मंदिराचे सुशोभीकरण झाल्यास आणखीच प्रसन्नता येते,असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांना सरकारकडून निधी जरी कमी येत असला तरी त्यांनी आपल्या निधीतून जी कामे घडवून आणली, ती कामे लोक कधीच विसरणार नाही. त्यामुळे समाजात फिरताना मला लोकांकडून चांगले समर्थन मिळत असल्याचेही ते म्हणाले. नानोडा - डिचोली येथील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानच्या शेड बांधकामाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, स्थानिक पंच नीलम कारापुरकर, नरेश गावस, माजी सरपंच पद्माकर मळीक, माजी सरपंच शाम हरमलकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य विश्वास गावकर, देवस्थानचे पुरोहित गोविंद फडके, मोहन केळकर, दिनेश दामले, देवस्थानचे अध्यक्ष वामन कळंगुटकर, सचिव ॲड. जीवन कळंगुटकर, साजूलो गावकर, उद्योजक महेश गावस, श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थानचे सचिव संतोष कळंगुटकर, अनिल नानोडकर, श्री सातेरी पूरमार देवीचे योगेश गावकर, गणेश गावकर, नानोडा बूथ समिती अध्यक्ष सचिन गावकर, मनोज कारापुरकर, वासुदेव गाड, अशोक नार्वेकर, अरुण कालेकर, दत्ता साखळकर, प्रतिमा कलंगुटकर, सुचिता गाड, महाजन मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व प्रभागात निधीचा योग्य विनियोग!

गेल्या चार वर्षांपासून आपण आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याबरोबर काम करीत असून त्यांच्याबरोबर काम करताना कधीच अडचण आली नाही. निधीचा योग्य वापर करताना मतदारसंघातील सर्व वॉर्डमधून समान कामाचे वाटप केले आहे, असे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी सांगितले.

आमदार डॉ. शेट्ये यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा व्यक्त करून सर्वांनी भेदभाव विसरून एकोप्याने राहण्याचे आवाहन केले. पंच नीलम कारापुरकर आणि देवस्थान समितीने शेड बांधकामाची मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार डॉ. शेट्ये आणि प्रदीप रेवोडकर यांचे आभार मानले. आमदारांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शेड बांधकामाचे रीतसर उद्‍घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन करून जीवन कळंगुटकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT