Shardiya Navratri 2025 Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

Navratri 2025 auspicious signs: मातेचे आगमन आणि प्रस्थान कोणत्या वाहनावर होणार, यावरून वर्षभरातील घडामोडींचा अंदाज बांधला जातो

Akshata Chhatre

Shardiya Navratri 2025 date and time: भक्तांसाठी आनंदाचा सोहळा असलेल्या शारदीय नवरात्रीची सुरुवात २२ सप्टेंबरपासून होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आदिशक्ती दुर्गा मातेची पूजा केली जाते. या वर्षी नवरात्री पूर्ण दहा दिवसांची असून, मातेचे आगमन आणि प्रस्थान कोणत्या वाहनावर होणार, यावरून वर्षभरातील घडामोडींचा अंदाज बांधला जातो. श्रीमद्देवी भागवत महापुराणानुसार, देवीचे वाहन तिच्या आगमनाच्या आणि प्रस्थानाच्या दिवशी ठरते.

शुभसंकेत देणारे देवीचे वाहन

यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवार, २२ सप्टेंबर रोजी होत आहे. शास्त्रांनुसार, सोमवार आणि रविवार या दिवशी मातेचे आगमन हत्तीवर होते. हत्तीवर मातेचे आगमन होणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे त्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतीत भरभराट होते. देशात धन-धान्याची वाढ होते आणि दुधाचे उत्पादनही वाढते. त्यामुळे या वर्षीचे आगमन समृद्धी आणि सुबत्तेचे संकेत देत आहे.

इतर दिवशी मातेचे आगमन कोणत्या वाहनावर होते:

  • शनिवार किंवा मंगळवार: घोड्यावर आगमन होते, जे राजकीय अस्थिरतेचे संकेत देते.

  • गुरुवार किंवा शुक्रवार: पालखीवर आगमन होते, जे समाजात कलह आणि मोठ्या दुर्घटनांचे संकेत देते.

  • बुधवार: देवीचे आगमन नौकेतून होते, जे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे.

प्रस्थान कोणत्या वाहनावर होणार?

नवरात्रीची सांगता २ ऑक्टोबर, गुरुवार रोजी विजयादशमीला होणार आहे. या दिवशी देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावर होते. विजयादशमी गुरुवारी असल्यामुळे मातेचे वाहन मानवी सवारी असेल. देवी मानवी वाहनावर परतणे अत्यंत शुभ मानले जाते. या स्थितीमुळे पुढील काळात सुख-शांती आणि भाग्याचा अनुभव येईल, अशी मान्यता आहे.

इतर दिवशी देवीचे प्रस्थान कोणत्या वाहनावर होते:

  • रविवार किंवा सोमवार: म्हशीवर प्रस्थान होते, जे दुःख आणि संकटाचे संकेत देते.

  • मंगळवार किंवा शनिवार: कोंबड्यावर प्रस्थान होते, जे तबाही आणि संघर्षाचे संकेत देते.

  • बुधवार किंवा शुक्रवार: हत्तीवर प्रस्थान होते, जे सुख-समृद्धीचे संकेत देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teachers' Day History: भारतात शिक्षक दिनासाठी 5 सप्टेंबरच का निवडला? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाशी जोडलेला 'तो' किस्सा जाणून घ्या

Rashi Bhavishya 05 September 2025: आरोग्याकडे लक्ष द्या, वाद टाळा; शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT