Goa Raponn Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

Goa Rapan Fishing: मुसळधार पावसाने अलंकृत झालेल्या गोव्यात, जूनपासून समुद्रावर जायला यांत्रिक ट्रॉलर्सला मनाई असल्यामुळे रापणीच्या जाळ्यात अडकलेल्या माशांवर मत्स्यप्रेमींचा डोळा असतो.

Sameer Panditrao

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रापण ओढली जात असताना तिच्या दोन्ही बाजूंची गर्दी अलीकडच्या दिवसात वाढलेली दिसते. मुसळधार पावसाने अलंकृत झालेल्या गोव्यात, जूनपासून समुद्रावर जायला यांत्रिक ट्रॉलर्सला मनाई असल्यामुळे रापणीच्या जाळ्यात अडकलेल्या माशांवर मत्स्यप्रेमींचा डोळा असतो. रापणीच्या जाळ्यातील फडफडीत मासे आपल्या पिशवीत कसे येतील याचा विचार करत त्यांचा जीव जाळ्याबाहेर तडफडत असतो. 

किनाऱ्यापासून समुद्रात गोलाकारात फेकलेली साधारण एक किलोमीटर लांब जाळी जेव्हा शिस्तबद्ध पद्धतीने ओढली जाता असते तेव्हा माणूस, समुद्र, कष्ट या तिन्हींचा समद्विभुज त्रिकोण एका विलक्षण पारंपारिक प्रज्ञेत तिथे साकारला जात असतो. अफाट क्षितिजाच्या पार्श्वभूमीवरचे हे दृश्य गेली शेकडो वर्षे समुद्रकिनाऱ्यावर नित्य साकारत आले आहे.

ते वेधक दृश्य पाहताना मानवी कष्टाच्या हवामानाला आणि दयेचे कुठलेच ऋतुचक्र न बाळगणाऱ्या निसर्गाला लाभलेली जन्मोजन्मीची तटस्थता आपल्याला स्वच्छ अनुभवायला मिळते. पावसाळ्यातील उधळलेला समुद्र आणि ढगाळ आकाश खोल मासेमारीसाठी आव्हान तयार करते परंतु त्यातून पारंपारिक मासेमारीसाठी मात्र एक अनोखे वातावरण तयार होते. 

पाण्यात गळ घालून बसलेले मत्स्यप्रेमी या दिवसात आपल्याला जागोजागी दिसतात.‌ गळ घालून मासेमारी करणे हे वैयक्तिक कौशल्याचे काम आहे तर रापण हे पारंपारिक मच्छीमारांचे सामुदायिक कौशल्य आहे. गोव्याच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली ती एक परंपरा आहे. रापणीत मिळालेले ताजे मासे पाककृतीत वापरणे हा स्वयंपाक घराचा उत्सव असतो. 

सुमारे आठ महिन्यांच्या यांत्रिक मासेमारीच्या शोषणातून मुक्त झालेल्या समुद्रातील रापणसारखी पारंपारिक मासेमारी पद्धती ही अधिक शाश्वत म्हणून ओळखली जाते. स्थानिक रेस्टॉरंटमधील ताटात देखील रापणीला मिळालेले मासे अधिक सन्मानाने वाढले जातात. ज्यानी समुद्रकिनाऱ्यावर ओढली जाणारी रापण कधी पाहिली नसेल त्यांनी रापण ओढतानाचे मच्छीमारांचे कौशल्य आणि चैतन्य अवश्य अनुभवायला हवे.‌ अथांग समुद्राच्या समोर, जाळ्याला जोडली गेलेली इवल्या माणसांची शरीरे त्या क्षणी रेतीवरची कोरीव लेणीच असतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: चारवेळा ओके म्हणाला, पाचव्यांदा नाही मिळाला रिस्पॉन्स; कॅसिनो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डायव्हरचा मृत्यू

Vasco: रस्त्यांवर जुनी वाहने, विक्रेते; 'वास्को'तील अतिक्रमणे हटणार कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

Rivona: 2 भावांचा दुर्दैवी मृत्यू! 'ते' कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये याची काळजी घ्या; आमदार सिल्वांची मागणी

Goa Live Updates: विरेंद्र ढवळीकर होणार फोंड्याचे नगराध्यक्ष

Chess Tournament: देशभरातील 600 खेळाडू भिडणार, 13 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा; लाखोंची बक्षिसे जाहीर

SCROLL FOR NEXT