Narkasur Online Sale Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Narkasur Online Sale: सतरंगी गोव्यातील अतरंगी ऑनलाईन विक्री; 3 फूटाच्या नरकासुराची किंमत तीन हजार

Goa Diwali 2024: कुंडई या गावात सुदय नाईक नावाच्या एका तरुणाने नरकासूरांची ऑनलाईन विक्री सुरु केलीये

Akshata Chhatre

Narkasur Online Sale in Goa

कुंडई: गोव्यात नरकासुर दहनाची परंपरा फार वर्षांपासून सुरु आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं. साधारण महिना दोन महिन्यांच्या तयारीनंतर नरकासुर तयार होतो. दिवाळीच्या काळात घराघरांमध्ये आणि रस्त्यांवर नरकासुर पाहायला मिळतात. गोव्यात वर्षानुवर्ष नरकासुराचं रूप बदलत जातंय आणि यंदाच्या वर्षी फोंडा तालुक्यातील कुंडई या गावात सुदय नाईक नावाच्या एका तरुणाने नरकासूरांची ऑनलाईन विक्री सुरु केलीये.

सुदय सांगतो की दरवर्षी घरी बनवला जाणारा नरकासुर यंदा त्यांनी विक्रीसाठी बाजारात आणलाय. साधारण तीन फुटांचा हा नरकासुर तो अडीज ते तीन हजार रुपयांना विकतोय. आत्तापर्यंत त्याने पाच नरकासुर बनवले होते ज्यांपैकी दोन नरकासुर विकले गेलेत. यामधील रंजक बाब म्हणजे हे दोन्ही नरकासुर त्यांने ऑनलाईन विकले आहेत.

नरकासुराशिवाय त्याने काही मुखवटे देखील बनवले असल्याचं सुदय सांगतो आणि आत्तापर्यंत तीन पैकी केवळ एकाच मुखवटा विक्रीसाठी बाकी आहे. नरकासुर बनवण्यासाठी एक महिन्याची मेहनत घ्यावी लागते आणि त्यामधून असा व्यवसाय केल्यास भरपूर फायदा होतो असं सुदाय नाईक म्हणाला.

गोव्यात असाल तर दिवाळीच्या लगबगितला नरकासुर दहनाचा भाग स्किप करू नका. गोव्याशिवाय बाकी कुठेच असा आगळावेगळा प्रकार पाहता येणार नाही, त्यामुळे खरोखर नवीन काहीतरी अनुभवयचं असेल तर या दिवाळीत गोव्याला नक्की भेट द्या..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT