Narkasur Making In Goa: गोव्यात दिवाळीची लगबग सुरु, नरकासुर तयारीने धरला जोर; गोमंतकीयांचा उत्साह शिगेला!

Pre-Diwali Goa: गोव्यातल्या नरकासुर इथली खासियत आहे, जर का गोव्यात दिवाळी अनुभवण्याच्या विचारात असाल तर नरकासुर दहन नक्कीच पाहून या.
Narkasur Making In Goa
Narkasur Making In GoaNarkasur in Goa Instagram
Published on
Updated on

Narkasur Making In Goa 2024

दिवाळी हा आनंदाचा, अंधारावर मात करण्याचा दिवस आहे आणि यालाच अनुसरुन गोव्यात एक आगळीवेळी प्रथा जपली जाते, ती म्हणजे गोव्यातला नरकासुर. नरकासुर इथली खासियत आहे आणि या क्षणाला जर का तुम्ही गोव्यात असाल तर नक्कीच आजूबाजूच्या रस्त्यावर तुम्हाला याच नरकासुराची जोरदार तयारी सुरु झालेली दिसते. कदाचित हे वाचून तुम्ही थोडे अचंबित व्हाल पण गोव्यातल्या घरांघरांमध्ये नरकासुर बनवला जातो.

चला मग गोव्यातल्या दिवाळीचा खास भाग म्हणजेच नरकासुराची तयारी कुठवर आलीये पाहून येऊया...

साधारणपणे नवरात्र झाल्यानंतर वेगेवेगळ्या वाड्यांवर नरकासुर बनवण्याची तयारी सुरु होते. नरकासुर कसा असेल, किती मोठा असेल वैगरे चर्चा करुन एक साचा ठरतो आणि यावर काम सुरु होतं. एखदा का नरकासुर कसा बनवायचा हे ठरलं म्हणजे त्यानंतर नरकासुर बनवण्यासाठी लागणारं साहित्य जमवायची लगबग सुरु होते. एकतर नरकासुर बनवण्यासाठी एक भलामोठा साचा गरजेचा असतो ज्यावर नंतर गवत, कागद इत्यादी गोष्टी जोडून त्याला मानवी आकार दिला जातो.

Narkasur in Goa Instagram

जर का तुम्ही संध्याकाळच्या वेळी गोव्यातील गावांमध्ये चक्कर टाकली तर या घडीला तरुण मुलं हमखास एकत्र येऊन हेच काम करताना दिसतात. हा नरकासुर काळानुसार थोडासा मॉर्डेन झालाय खरा, पण त्याचा मोठा आवाज, भयानक हसणं आणि आजूबाजूला सुरु असलेले लाईट इफेक्ट यामुळे डॅशिंग लूक आणि सिक्स पॅक्स असलेला नरकासुर सुद्धा भयंकर दिसतो.

Narkasur Making In Goa
Goa Police Alert: यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गोवा पोलीस अलर्ट मोडवर; NSG सोबत करणार दहशतवाद विरोधी सराव मोहीम

गोव्याला पहिल्यांदा भेट देत असाल आत्ताच बाजराची एक सैर करून या, कारण यावेळी तुम्हाला काही दुकानांमध्ये नरकासुराचा भलेमोठे मुखवटे पाहायला मिळतील. नरकासुर हा राक्षस होता आणि तो अक्राळ-विक्राळ दिसलाच पाहिजे म्हणून मग ही मुलं असे मोठाले, भयंकर मुखवटे, लांब नखं असलेले हात-पाय सांगाड्याला जोडून त्याला बलशाली, क्रूर आणि भयंकर स्वरूप देतेत.

अनेकवेळ नरकासुराच्या पोटात काही फटाके वैगरे भरले जातात,जेणेकरून दिवाळीच्या दिवशी पहाटे नरकासुर दहन सुरु झाल्यानंतर आगीसोबत फटाक्यांची मजा घेता येते. नरकासुर बनवण्यासाठी जमलेली मुलं दहनानंतर आग नीट विझली आहे ना, कुठे पसरली तर नाही ना याची काळजीपूर्वक पाहणी करतात.

Narkasur in Goa Instagram

गोव्यात असाल तर दिवाळीच्या लगबगितला हा महत्वाचा भाग स्किप करू नका. गोव्याशिवाय बाकी कुठेच असा आगळावेगळा प्रकार पाहता येणार नाही, त्यामुळे खरोखर नवीन काहीतरी अनुभवयचं असेल तर या दिवाळीत गोव्याला नक्की भेट द्या..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com