गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात सध्या दिवाळीची तयारी सुरु झालीये आणि गोव्यातली दिवाळी म्हटलं की ती नरकासुराशिवाय अपूर्ण असते.
गावागावांमध्ये तरुणांचा गट एकत्र येऊन नरकासुर बनवतात.
गोव्यात ही परंपरा कधीपासून सुरु झाली हे सांगता येणार नाही मात्र तीस वर्षांपूर्वीचा गोव्यातील नरकासुर आणि आजचा नरकासुर यात फरक मात्र नक्कीच आहे.
पूर्वी नरकासुर हे लहानमुलांसाठी आकर्षण होतं. आजूबाजूला असलेल्या वस्तू जवळ करून हा राक्षस बनवला जायचा आणि छोट्याशा गाडीवरून त्याची मिरवणूक निघायची.
आजही नरकासुर बनवणं हे आकर्षण आहेच पण कुठेतरी त्याला स्पर्धात्मक रूप आलंय.
उत्तम नरकासुर बनवला जाण्यावर रोख रक्कम सारखे प्रकार सुरु झालेत. मोठमोठाली गाणी, धांगडधिंगा यात नरकासुर दहनाची खरी मजा लुप्त झाल्यासारखं वाटतं.