Krishna Janmashtami Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Krishna Janmashtami celebration: भारताच्या विविध भागांत जन्माष्टमी विविध रूपांत साजरी केली जाते. उत्तर भारतात, मथुरा व वृंदावन येथे हा सण विशेषतः रासलीला आणि कृष्णलीला या नृत्य-नाट्यद्वारे साजरा केला जातो.

Sameer Panditrao

कृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. हा सण विष्णूचा अथवा अवतार, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या उत्सवानिमित्य साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये कृष्णाला महत्वाचे स्थान दिले गेले आहे.

कृष्ण जन्माष्टमी अष्टमी दिवशी कृष्ण पक्षात, श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते. हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. हा विशेषतः वैष्णव परंपरेतील लोकांसाठी महत्त्वाचा आहे.

भारताच्या विविध भागांत जन्माष्टमी विविध रूपांत साजरी केली जाते. उत्तर भारतात, मथुरा व वृंदावन येथे हा सण विशेषतः रासलीला आणि कृष्णलीला या नृत्य-नाट्यद्वारे साजरा केला जातो.

महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तरुण मंडळे मानव मनोरे रचून हंडी फोडतात. गुजरात व राजस्थानमध्ये लोक गरबा, रास नृत्य करतात.

दक्षिण भारतात, कर्नाटकातील उडुपी -मंगळूरआणि केरळमध्ये कृष्णाष्टमी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव म्हणून साजरी केली जाते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये लोक उपवास, भजन आणि कृष्णाच्या मूर्तींचे पूजन करतात.

पश्चिम व पूर्व भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल, असाम आणि मणिपुरमध्ये, कृष्ण लीला, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मणिपूरमध्ये रासलीला नृत्य प्रसिद्ध आहे.

भारताच्या बाहेरही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये कृष्ण जन्माष्टमीदिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. ढाक्यातील धाकेश्वरी मंदिरातून सुरू होणारी मिरवणूक प्रसिद्ध आहे.

परंपरा १९०२ पासून सुरू झाली आणि १९४८ मध्ये थांबली. १९८९ पासून मिरवणूक आणि इतर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आले.

पाकिस्तानातले कराची येथील स्वामीनारायण मंदिर येथे साजरी होणारी जन्माष्टमी प्रसिद्ध आहे. इथे पारंपरिक भजनाचे कार्यक्रम होतात. नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात जन्माष्टमी साजरी होते. इथले भाविक मध्यरात्रीपर्यंत उपवास करतात, गीतेची पारायणे आणि भक्तिपर गीते गात भगवान कृष्णाचे नामस्मरण करतात.

यासोबतच जगभर फिजी, अमेरिका व कॅरिबियन देशांतील हिंदू समुदाय कृष्ण जन्माष्टमी भक्तिभाव, उपवास आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहाने साजरा करतात. हा सण फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा देखील प्रतीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT