Dhalanche Mand Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

Dhalotsav Goa: : डिचोलीत सर्वत्र सध्या धालांचा उत्साह सुरु असून, गावोगावी धालांचे मांड फुलू लागले आहेत. धालांच्या मांडावरती रात्रीही जागू लागल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीत सर्वत्र सध्या धालांचा उत्साह सुरु असून, गावोगावी धालांचे मांड फुलू लागले आहेत. धालांच्या मांडावरती रात्रीही जागू लागल्या आहेत. धालोगीते फुगड्या आदी पारंपरीक लोकसंस्कृतीचे दर्शनही गावोगावी धालांच्या मांडांवर होत आहे.

डिचोलीतील बहूतेक भागात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने धालोत्सव साजरा करण्यात येतो. काही भागात पाच तर काही भागात सात दिवस धालोत्सव परंपरेप्रमाणे साजरा करण्यात येतो. ''रंभा अवसर'' ही प्रथा कारापूर, धुमासेसह काही भागातील धालांच्या मांडांवरील आकर्षण आहे.

आजतागायत ही परंपराही चालू आहे. धालो हा एक पारंपरीक लोककला प्रकार. धालो म्हणजे महिलांचा आनंद द्विगुणित करणारा उत्सव. पौष महिना सुरु झाला, की सर्वत्र धालोत्सवाचे वेध लागतात. सध्या बहूतेक भागात धालांची धूम सुरु आहे. दरम्यान, मुळगाव आणि धुमासे येथील धालोत्सवाची परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात सांगता झाली.

पाच दिवस उत्सव!

गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानच्या धालोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. बुधवारी परंपरेप्रमाणे धालोत्सवाची सांगता होणार आहे. गावकरवाडा येथील धालोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येतो. धालोत्सवात येणाऱ्या सोमवारी श्री शांतादुर्गा मंदिरातून निघणारी श्रींची पालखी धालांच्या मांडावर नेण्याची प्रथा आहे. बुधवारी ''मांड'' ठेवल्यानंतर धालोत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT