King Momo Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Carnival 2025: एकाच घरातील पाचवा किंग मोमो बनणारा क्लिव्हन म्हणतो, "कार्निव्हल म्हणजे फक्त मौज नाही...."

Tom Fernandes King Momo: क्लिव्हनच्या मनात त्याच्या बालपणीची ती आठवण अजूनही ताजी आहे. तो सांगतो, 'जेव्हा माझे वडील किंग मोमो बनले होते तेव्हा मी शाळेत होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Cleven Fernandes Continues Family Legacy as King Momo in Goa Carnival 2025

किंबर्ली कुलासो

क्लिव्हनच्या मनात त्याच्या बालपणीची ती आठवण अजूनही ताजी आहे. तो सांगतो, 'जेव्हा माझे वडील किंग मोमो बनले होते तेव्हा मी शाळेत होतो. माझ्या वर्गमित्रांनी मला राजाचा मुलगा असे संबोधायला सुरुवात केली होती. माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती. मला एखादा राजकुमार बनल्यासारखेच वाटत होते.' 

यंदा किंग मोमो बनायचा मान मिळालेल्या क्लिव्हन फर्नांडिसला एक 'रॉयल' पार्श्वभूमी आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचे वडील टॉम फर्नांडिस कार्निव्हलमध्ये चार वेळा किंग मोमो बनले होते, त्याचे काका तिमोतिओ फर्नांडिस १९६५ यावर्षी सुरू झालेल्या कार्निव्हलमधील पहिले किंग मोमो होते, त्याचे काका- लॉरेन्सो आणि बोंडो यांनी देखील किंग मोमोचा मुकुट परिधान केला आहे. त्यामुळे क्लिव्हनसाठी हा कार्निव्हल खास आहे. गोव्यातील कार्निव्हलच्या इतिहासात प्रथमच एकाच घरातील पाचवा सदस्य किंग मोमो बनणार आहे. अर्थात हा कौटुंबिक वारसा चालवण्याचा कौतुकास्पद सन्मान असला तरी त्याला तो सहजासहजी मिळालेला नाही. 'मी गेली ३ वर्षे किंग मोमोसाठी अर्ज करत होतो. गेल्या दोन वर्षात मी उपांत्य फेरीही गाठली होती मात्र हे वर्ष माझ्यासाठी भाग्यवान ठरले.' असे क्लिव्हन सांगतो.

ही पहिलीच वेळ आहे जिथे किंग मोमो एक जहाजावर काम करणारी व्यक्ती आहे. यावर्षी मार्चच्या अंती तो पुन्हा जहाजावर परतणार आहे, परंतु आत्ता तो हाताशी आलेल्या या उत्कृष्ट संधीवर लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या पोशाखाबद्दल क्लिव्हन उत्साहाने बोलतो, 'माझ्या पोशाखाला अनेक स्तर आणि सोन्याच्या साखळ्या असतील त्यामुळे हा  पोशाख नक्कीच अनोखा ठरेल. कदाचित कार्निव्हलच्या काळात हवामान खूप उष्ण आणि दमट असेल, परंतु किंग मोमो बनणे ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे.‌'

वेशभूषेचे नियोजन करण्यापासून मुकुटाचा तपशील ठरवताना क्लिव्हन प्रत्येक पैलूची व्यवस्थित काळजी घेताना दिसतो. त्याचा मुकुट एक किलोपेक्षा अधिक वजनाचा असेल. हा मुकुट बनवण्यासाठी तो त्याच्या वडिलांची मदत घेत आहे. कृत्रिम हिरे आणि मौल्यवान खडे जडवलेला हा मुकुट असेल. तो सांगतो, 'लहान असताना मी माझे वडील आणि काकांना कार्निव्हलच्या फ्लोटसमध्ये भाग घेताना पाहायचो. तो आनंद अवर्णनीय होता.‌ माझे काका बोंडो किंग मोमो बनले होते तेव्हा मी त्यांचा अंगरक्षक बनलो होतो. एक वेगळाच रोमांच मी त्यावेळी अनुभवला होता. यंदाचा कार्निव्हल अधिकच रोमांचक असेल.'

यावर्षीच्या कार्निव्हल परेडची थीम आहे, 'धार्मिक एकता'. ही थीम का निवडली आहे हा प्रश्न विचारता क्लिव्हनचे उत्तर होते, 'जगभरातच नव्हे तर गोव्यातही विविध धर्मांमध्ये द्वेष भरलेला दिसतो आहे. ते दिवस आता राहिलेले नाहीत जेव्हा गोव्यात (Goa) वेगवेगळ्या धर्माचे लोक एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांचे सण साजरे करायचे. कार्निव्हल म्हणजे फक्त मौज नाही त्यात सामाजिक संदेशही असतो.' यावर्षी कार्निव्हल २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित होणार आहे. रंगीबिरंगी चित्ररथ, चैतन्यपूर्ण संगीत, मनमोहक नृत्ये यातून गोव्याचा अद्वितीय सांस्कृतिक वारसा प्रकट होत असतो आणि स्थानिकांसह हजारो पर्यटक त्याचा आनंद घेतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT