Christmas cattle sheds Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Culture: डॉ. मोहम्मद आणि ख्रिसमसचा गोठा

Don bosco animation center christmas decorated cattle sheds: ख्रिसमसच्या काळात सजवल्या जाणाऱ्या गोठ्यांची परंपरा गोव्यात खूप खास आहे. प्रत्येक जण स्वतःच्या परीने हा गोठा विशेष प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करतो.

गोमन्तक डिजिटल टीम

ख्रिसमसच्या काळात सजवल्या जाणाऱ्या गोठ्यांची परंपरा गोव्यात खूप खास आहे. प्रत्येक जण स्वतःच्या परीने हा गोठा विशेष प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करतो. यंदा बाणावली येथील डॉन बॉस्को अनिमेशन सेंटरमध्ये तयार केला गेलेला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणपूरक गोठा, त्याच्या वेगळेपणामुळे लोकांना आकर्षित करतो आहे. हा गोठा एक पारंपारिक जपानी कलाप्रकार, ओरिगामी, वापरून बनवला गेला आहे. एक क्लिष्ट आणि अर्थपूर्ण त्रिमितीय सेअपमधील हा गोठा पारंपारिक गोठ्यांपेक्षा नक्कीच वेगळा आणि अनोखा आहे. 

या गोठ्यातील पवित्र कुटुंब, मेंढपाळ, प्राणी हे सारे कागदांच्या घड्या करून बनवले गेले आहेत. या कलात्मक आकृत्या तयार करण्यासाठी आवश्यक असलेली अचूकता, त्यासाठी लागणारा संयम आणि कौशल्य केवळ कलात्मक उत्कृष्टतेचेच नव्हे तर पुराणकथेवर असलेल्या गाढ भक्तीचे देखील निदर्शक आहे.

ही कलाकृती तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. मोहम्मद मेमन म्हणतात की त्यांनी ओरिगामीची ही कला कोविड-19 च्या काळात युट्युब आणि पिंटरेस्टद्वारा शिकून घेतली. डॉक्टर मोहम्मद हे एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. या गोठ्याच्या निर्मितीबद्दल बोलताना ते सांगतात, 'ही संपूर्ण रचना इको फ्रेंडली आहे आणि ती बनवताना प्लास्टिक, थर्माकोल, एपोक्सी, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा कोणताही नॉन-बायोडिग्रेडेबल पदार्थ वापरण्यात आलेला नाही. त्यात फक्त कागदाचा वापर झालेला आहे.'

कमीत कमी घटक वापरून बनवण्यात आलेला हा गोठा ख्रिसमसच्या संदेशातील साधेपणा आणि नम्रता या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. आकृत्यांमधील घड्या आणि त्यांचे आकार येशू ख्रिस्ताच्या प्रगल्भ आगमनाचे प्रतीक बनतात. ही सबंध रचना तयार करण्यासाठी 7 दिवस लागले आणि एकूण 9 लोक त्यावर काम करत होते. डॉ. मोहम्मद सांगतात, 'मी स्वतः या रचनेवर रोज 10 ते 12 तास काम करायचो. यातील प्रत्येक घटक हाताने बनवला गेला आहे. या कामात अर्थातच मला माझ्या मित्रांकडून खूप मदत मिळाली आहे.'

या रचनेमधील दगड आणि डोंगर कागदी आहेतच फणा त्या व्यतीरिक्त त्यात सुमारे 100 इतर कागदी कलाकृती आहेत. 2020 यावर्षी कोविड काळातील लॉकडाऊनच्या वेळी डॉ. मोहम्मद मुंबईत एका क्लिनिकमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना अशी रचना तयार करण्याची कल्पना सुचली. 'तेव्हा ख्रिसमस सजावट दुर्मिळ बनली होती आणि मला त्या संबंधात काहीतरी करायचे होते. पिंटरेस्टवर मला ओरिगामीचा शोध लागला. सजावटी आता फक्त कागदाची गरज होती. मी माझ्या क्लिनिकमध्ये एक लहान कागदी गोठा बनवला आणि सर्वांना तो आवडला.'

धर्म हा अलीकडच्या काळात वादग्रस्त विषय बनला आहे. डॉ. मोहम्मद दयाबुद्धीवर विश्वास ठेवतात. त्यांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाले आहे. ख्रिसमस, ईस्टर साजरा करण्याबरोबरच ते गणपती विसर्जनाला देखील उपस्थित असतात. ते दलाई लामांच्या विधानांवर विश्वास ठेवतात. दलाई लामा म्हणतात, 'हा माझा साधा धर्म आहे. मला मंदिरांची गरज नाही; क्लिष्ट तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपला स्वतःचा मेंदू, स्वतःचे ह्रदय हेच आपले मंदिर आहे; हे तत्त्वज्ञान ‘दयाळूपणा’ संबंधात आहे.'

डॉ. मोहम्मद सांगतात, 'वेगवेगळ्या समुदायांमध्ये राहण्याची आणि त्यांचा प्रत्येक सण त्यांच्याबरोबर साजरा करण्याची मला पुरेशी संधी मिळाली आहे. गुजराती लोकांबरोबर मी नवरात्री आणि दांडिया साजरे करतो. जैनांसोबत काम करत त्यांच्या शांततापूर्ण प्रथांचा अनुभव घेतो. आरती आणि कीर्तनात माझा सहभाग असतो. मी मंदिरांना भेटी देतो आणि ईदसाठी माझ्या मित्र-मैत्रिणींना निमंत्रित करतो. हे सारे माझ्या आत्म्याला उत्थान देणारे असते.'

बाणावली येथील दोन बॉस्को अनिमेशन सेंटरमधील हा ओरिगामी गोठा पाहण्यास चुकवू नका. 7 जानेवारी 2025, सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत त्याला भेट देऊन आपल्याला एका उत्कृष्ट कलाकृतीचा आनंद घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT