Goa Culture Under Portuguese Rule: 'पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, तरीही...': सदानंद शेट तानावडे

Goa Culture Intact After 450 Years Of Rule: गोव्यात साडेचारशे वर्षे पोर्तुगीज सत्तेने राज्य केले, तरीही आम्ही आमची संस्कृती अबाधित राहिली, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले.
Goa Culture Under Portuguese Rule: 'पोर्तुगिजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, तरीही...': सदानंद शेट तानावडे
Goa BJP State President Sadananda Shet Tanawade Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा ही कलाकारांची भूमी आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत आहे. आजच्या संगणक युगात देखील आपल्याकडे एखादी कला असणे आवश्‍‍यक आहे. गोव्यात साडेचारशे वर्षे पोर्तुगीज सत्तेने राज्य केले, तरीही आम्ही आमची संस्कृती अबाधित राहिली, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले.

भाजपच्‍या सांस्कृतिक विभागाने गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित केलेल्‍या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्‍यात तानावडे बोलत होते. येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्‍या या सोहळ्‍याला भाजप सांस्कृतिक विभागाचे ॲड. दीपक तिळवे, शिरीष लवंदे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, डॉ. पूर्णानंद च्यारी उपस्थित होते. चतुर्थीनिमित्त सजावट स्पर्धा, कौटुंबिक आरती स्पर्धा, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा घेण्‍यात आली होती. त्‍यातील विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षिसे देण्‍यात आली. कार्यक्रमादरम्यान सिद्धकला अकादमीतर्फे नृत्य सादर करण्यात आले.

Goa Culture Under Portuguese Rule: 'पोर्तुगिजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, तरीही...': सदानंद शेट तानावडे
Goa Navratri 2024: पोर्तूगीजांच्या भीतीपोटी स्थलांतर; श्री कामाक्षी रायेश्वर संस्थानाचा इतिहास जाणून घ्या

सजावटीत साहिल बोरकर, रांगोळीत सोनिया घाडी प्रथम

सजावट स्पर्धेतील प्रथम पारितोषिक साहिल बोरकर (मेरशी) यांना, द्वितीय शुभम मयेकर तर तृतीय बक्षीस प्रितेश नाईक यांना देण्‍यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिके किशोर आमोणकर, सुबोध हडफडकर व आदर्श प्रियोळकर यांना मिळाली. तर, रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोनिया घाडी, द्वितीय सीताराम जोशी, विनय नाईक यांना तर उत्तेजनार्थ बक्षिसे गौतम उडेकर, सूरज केरकर, श्रुती कुंभार यांना प्राप्त झाली.

आरती स्‍पर्धेत शाणू गावस कुटुंब अव्‍वल

कौटुंबिक आरती स्पर्धेत प्रथम पारितोषिक शाणू गावस आणि कुटुंबीयांना मिळाले. दीप सावंत आणि कुटुंबीयांना द्वितीय तर अमेय सांबरे आणि कुटुंबीयांना तृतीय बक्षीस मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिके तनय बाळे आणि कुटुंबीय, मोने वाघुरे आणि कुटुंबीय व अमदकर कुटुंबीयांना प्राप्‍त झाली.

Goa Culture Under Portuguese Rule: 'पोर्तुगिजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, तरीही...': सदानंद शेट तानावडे
South Goa District Hospital: 'लाल फिती'च्या कारभारामुळे रुग्णांची परवड, आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी; नायक यांची मागणी

सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

राज्‍यातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपचा सांस्कृतिक विभाग धर्म, पंथ आणि राजकारण बाजूला ठेवून कार्य करत आहे. जनतेनेही त्‍यासाठी सहकार्य करण्‍याची गरज आहे.

चित्रकलेत जीव्या नार्वेकरची बाजी

चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक जीव्या नार्वेकर, द्वितीय वालेशा कार्दोझ तर तृतीय बक्षीस अवनी लोटलीकर यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके लेस्ली कार्दोझ, सुयश देसाई व समर्थ देसाई यांना मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com