Houthi Rebels Attack Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Houthi Rebels Attack Saudi Arabia: हौथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला! 'अरामको'चे तेल प्रकल्प क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने लक्ष्य

Yemen Houthi Missile Drone Attack: येमेनमधील इराण समर्थक हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे व ड्रोनने हल्ला केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कैरो: येमेनमधील इराण समर्थक हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे व ड्रोनने हल्ला केला. सौदीने मोक्याच्या होदेईदा शहरावर केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

हौथींचा लष्करी म्होरक्या याह्या सारी याने एका निवेदनाद्वारे सांगितले की, जगातील सर्वांत मोठी तेल कंपनी असलेल्या ‘अरामको’च्या यानबू आणि जिझान येथील प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले आहे. सौदी अरेबियाच्या नागरी संरक्षण विभागाने शनिवारी पहाटे दोन्ही शहरांमध्ये धोक्याचे इशारे देण्यात आल्याचे मान्य केले असले, तरी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणमध्ये शनिवारी रात्री (ता. २५) कोणतेही हल्ले झाले नसल्याचे वृत्त आहे. हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची कोंडी करण्यासाठी आणि येमेनची राजधानी साना येथील विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ‘बाब अल मंदेब’ ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे.

बंडखोरांच्या राजकीय परिषदेचे प्रमुख महदी अल-मशात यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत आमच्यावरील हल्ले थांबत नाहीत आणि नाकेबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग मोकळा होणार नाही. जगातील एकूण व्यापारापैकी १२ टक्के व्यापार आणि २५ टक्के कंटेनर वाहतूक याच मार्गावरून होते. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने सांगितले की, त्यांनी होदेईदा प्रांतातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याचे हौथी बंडखोरांच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नेतान्याहू जाणार अमेरिकेला

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT