Nawaz Sharif & Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Year Ender 2023: इम्रान खान यांचं पंतप्रधानपद गेलं ते माजी पंतप्रधान शरीफांची घरवापसी; पाकिस्तानात असा रंगला सत्तेचा डाव

Pakistan Politics: गेल्या एक वर्षापासून (2023) पाकिस्तानचे राजकारण चित्रपटांमध्ये घडत असेलेल्या सीन्ससारखे सुरु आहे.

Manish Jadhav

Pakistan Politics: गेल्या एक वर्षापासून (2023) पाकिस्तानचे राजकारण चित्रपटांमध्ये घडत असेलेल्या सीन्ससारखे सुरु आहे. त्यात सर्वकाही आहे: अॅक्शन, सस्पेन्स, ड्रामा. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तान सध्याच्या राजकीय गोंधळातून बाहेर येईल, अशी आशा होती? पण इथे ना राजकीय संघर्ष थांबला ना निवडणुका झाल्या. सध्या 2023 मध्ये ज्या दोन मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या, त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे इम्रान खान यांची अटक आणि नवाझ शरीफ यांची घरवापसी. या दोन मोठ्या घटना येत्या निवडणुकीत पाकिस्तानचे राजकीय भवितव्य ठरवतील.

खरे तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे माजी अध्यक्ष इम्रान खान यांची अटक ही या वर्षातील मोठी घटना होती. कारण इम्रान यांना अटक होताच पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झाला. इम्रान खान यांच्या समर्थकांनी देशभरात जोरदार निदर्शने केली. अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या. ज्यामध्ये सर्वसामान्यांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले आणि हजारो लोकांना अटकही झाली.

पाकिस्तानचा डार्क चाप्टर

इम्रान खान अनेक महिन्यांपासून पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारविरोधात मोर्चा खोलला होता. अखेर 9 मे 2023 रोजी संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात जो गदारोळ माजला होता तो इथे यापूर्वी कधीच झाला नव्हता. पाकिस्तानी लष्कराने 9 मे रोजी झालेल्या निषेधाचे वर्णन 'डार्क चाप्टर' म्हणून केले होते. इम्रान खान यांच्यावर हल्ला करताना तत्कालीन पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते की, राजकारणात बदला घेतल्याने चांगले परिणाम होत नाहीत. इम्रान खान यांनी देशातील कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे शरीफ म्हणाले होते. त्यांनी 60 अब्ज रुपयांचा घोटाळा केला, असेही ते म्हणाले होते. ते पुढे म्हणाले होते की, जे काम शत्रूने देशाविरुद्ध केले नाही ते पीटीआयने केले.

पाच वर्षांसाठी अपात्र

इम्रान समर्थकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून ते लष्कराच्या मुख्यालयापर्यंत जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या होत्या. तोशाखाना प्रकरणात न्यायालयाने ऑगस्टमध्ये खान यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. यानंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले.

गोहर अली खान पीटीआयचे नवे अध्यक्ष

सध्या पाकिस्तानात तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जागी बॅरिस्टर गोहर अली खान यांची पीटीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या. खुद्द इम्रान खान यांनीच गौहर खान यांची नियुक्ती केली.

नवाझ शरीफ मायदेशी परतले

त्याचवेळी, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पुनरागमनानंतर पाकिस्तानमध्ये राजकारण तापले आहे. अशा स्थितीत तुरुंगात स्लो पॉयझन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली. इम्रान यांनी देश सोडण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याशी असे केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. नवाझ शरीफ चार वर्षे ब्रिटनमध्ये राहून 21 ऑक्टोबर रोजी दुबईमार्गे पाकिस्तानात परतले. येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत अशा वेळी ते पाकिस्तानात परतले आहेत. अशा स्थितीत नवाझ शरीफ यांच्या मायदेशी परतण्याचा परिणाम पाकिस्तानच्या राजकारणावरही पाहायला मिळणार आहे. कारण त्यांचे कट्टर विरोधक इम्रान खान तोषखाना प्रकरणात तुरुंगात आहेत.

पाकिस्तान मध्ये सार्वत्रिक निवडणुका

पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी 2024 दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. मात्र, सध्या पाकिस्तानची सत्ता काळजीवाहू पंतप्रधानांच्या हाती आहे. दुसरीकडे, नवाझ शरीफ यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, चार वर्षे दूर राहूनही त्यांची त्यांच्या पक्षावरील पकड मजबूत आहे. नवाझ शरीफ यांची अनुपस्थिती असतानाही, मुलगी मरियम नवाज आणि भाऊ शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना सत्तेवरुन हटवून पक्षाला पुन्हा सत्तेत आणले. पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीत नवाझ शरीफ पूर्णपणे फिट आहेत.

इम्रान खानची एन्ट्री

मिळालेल्या माहितीनुसार, नवाझ शरीफ यांना पाकिस्तानी न्यायालयाने अल-अझिझिया मिल्स आणि एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवले आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याआधी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पगार जाहीर न केल्यामुळे आजीवन अपात्र ठरवले होते. यानंतर शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला. तर तुरुंगात असलेल्या नवाझ शरीफ यांनी प्रकृतीचे कारण देत 2019 मध्ये लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. त्यावर लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी लंडनला जाण्याची परवानगी दिली. पण चार आठवड्यांऐवजी ते चार वर्षांनी लंडनहून परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अतिक्रमणे हवटण्यासाठी राबवण्यात येणार विशेष मोहीम; रुमडामळ ग्रामसभेत ठराव!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT