Pakistan Political Crisis: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपती अल्वींनी घेतला मोठा निर्णय

Dissolution of National Assembly: बुधवारी रात्री राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना यासंदर्भातील पत्रही पाठवले, ज्यावर रात्री उशिरा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.
Dissolution of National Assembly:
Dissolution of National Assembly:Dainik Gomantak
Published on
Updated on

Dissolution of National Assembly Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधी बरखास्त करण्याची शिफारस केली.

त्यांनी बुधवारी रात्री राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना यासंदर्भातील पत्रही पाठवले, ज्यावर रात्री उशिरा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

यापूर्वी, पाकिस्तानमध्ये अशी अटकळ होती की, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) नेतृत्वाखालील आघाडी सरकार आणखी दोन दिवस सत्तेवर राहू शकते.

त्यांना 11 ऑगस्ट रोजी संसद बरखास्त करायची होती. मात्र, भीतीपोटी त्यांना हा निर्णय तातडीने घेणे भाग पडले.

अल्वी यांच्या भूमिकेमुळे सरकार घाबरले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाने 11 ऑगस्ट रोजी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस केल्यास, राष्ट्रपती आरिफ अल्वी वेळेच्या कमतरतेच्या कारणास्तव कनिष्ठ सभागृह बरखास्त करण्याची अधिसूचना ताबडतोब जारी करतील, अशी भीती होती.

आरिफ अल्वी हे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे माजी नेते आहेत, ज्यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला होता. अशा स्थितीत त्यांच्या या भूमिकेबाबत सरकार घाबरले होते.

Dissolution of National Assembly:
Pakistan: राजकारणाच्या खेळपट्टीवर इम्रान खान आऊट, निवडणूक आयोगाने दिला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

राष्ट्रपतींकडे 2 पर्याय होते

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रपती अल्वी यांना नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी पत्र पाठवून काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरु केली, असे जिओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रपती अल्वी यांच्याकडे 2 पर्याय उरले होते.

ते एकतर नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी ताबडतोब अधिसूचना जारी करु शकतात किंवा 48 तासांसाठी विलंब करु शकतात. त्यांनी पहिला पर्याय निवडला आणि नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा आदेश जारी केला.

Dissolution of National Assembly:
Pakistan PM Shehbaz Sharif: शाहबाज शरीफ सोडणार खुर्ची? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाबाबत आली मोठी बातमी!

इम्रान खान यांच्यावर 5 वर्षांची बंदी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल असेंब्ली वेळेआधी बरखास्त झाल्यास, पाकिस्तानचा निवडणूक आयोग 90 दिवसांच्या आत निवडणुका घेईल.

नॅशनल असेंब्लीने आपला संवैधानिक कार्यकाळ पूर्ण केला असता तर 60 दिवसांच्या आत निवडणुका झाल्या असत्या. या निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 5 वर्षांसाठी निवडणूक (Election) लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com