Pakistan Political Crisis: इम्रान खान यांच्या निवासस्थानी लपले 30-40 दहशतवादी? पोलिसांचा जमान पार्कला वेढा

Pakistan: इम्रान लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत असतानाच पाकिस्तान सरकार त्यांना पुन्हा अटक करुन तुरुंगात पाठवण्याच्या तयारीत आहे.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. इम्रान लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत असतानाच पाकिस्तान सरकार त्यांना पुन्हा अटक करुन तुरुंगात पाठवण्याच्या तयारीत आहे.

यातच आता, पाकिस्तानच्या पंजाब सरकारने इम्रान यांच्यासंबंधी एक खळबळजनक दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, इम्रान यांच्या निवासस्थानी जमान पार्कमध्ये 30-40 दहशतवादी लपण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्या दहशतवाद्यांना 24 तासांत ताब्यात घेण्याचे सांगण्यात आले आहे. इम्रान यांच्या निवासस्थानाला पाकिस्तान पोलिसांनी वेढा घातला आहे.

दरम्यान, पंजाब सरकारमधील मंत्री आमिर मीर यांनी सांगितले की, 'जिओ-फेन्सिंगद्वारे तांत्रिक आणि गुप्तचर माहिती देखील मिळाली होती की इम्रान खान यांच्या जमान पार्क निवासस्थानी दहशतवादी आश्रय घेत आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'या लोकांमध्ये लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवर हल्ला करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना ताब्यात देण्याची विनंती पीटीआय नेतृत्वाला केली जात आहे.

लष्करी कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या आणि जमान पार्कमध्ये आश्रय घेत असलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात देण्यासाठी पंजाबचे अंतरिम सरकार (Government) पीटीआय नेतृत्वाला 24 तासांचा अवधी देत ​​आहे.'

Imran Khan
Pakistan Political Crisis: पाकिस्तानची दैना! इम्रान खान यांच्या निकवर्तीयाने पोलिसांना...; पाहा Video

अमीर मीर पुढे म्हणाले की, '9 मे रोजी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवर हल्ला करणारे आरोपी जमान पार्कमधील इम्रान खान यांच्या संपर्कात होते.'

ते पुढे असेही म्हणाले की, 'हल्ल्याचे सूत्रधार काही प्रमुख नेत्यांच्या संपर्कात होते, ते त्यांना सूचनाही देत होते.' लष्कराच्या प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या ‘दहशतवाद्यांवर’ लष्करी न्यायालयात खटला चालवला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

दुसरीकडे, इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला होता. 9 मे रोजी मोठ्या संख्येने पीटीआय समर्थकांनी पाकिस्तानी लष्कराच्या निवासस्थानावर हल्ला केला.

यादरम्यान प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड झाली. पाकिस्तान सरकारने या हल्ल्यासाठी इम्रान खान यांना जबाबदार धरले. विशेष म्हणजे, त्या घटनेशी संबंधित अनेकांना अटकही करण्यात आली.

Imran Khan
Pakistan Political Crisis: 'मला पुढील 10 वर्षे तुरुंगात ठेवण्याची योजना...', इम्रान खान यांचा लष्करावर गंभीर आरोप

तसेच, इम्रान खान (Imran Khan) यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या 'बेकायदेशीर अटक आणि अपहरण'चा तीव्र निषेध केला आहे. ट्विटरवर दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, शाह मेहमूद कुरेशी आणि असद उमर यांना एका आठवड्याहून अधिक काळ झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com