Pakistan Political Crisis: आता पाकिस्तानातील पत्रकार निशाण्यावर, लष्कराविरोधात बोलणाऱ्यांना...

Political Crisis: पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनंतर आता लष्कर आणि सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Pakistan Army
Pakistan ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनंतर आता लष्कर आणि सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

इम्रान यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी देशभरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी दोन पत्रकारांसह 4 जणांनाही अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अस्लमच्या नावावर इस्लामाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 9 मे रोजी सुमारे 25 लोकांनी शाहीन शाहबाई आणि वजाहत सईद खान या पत्रकारांचे स्क्रीनशॉट शेअर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तक्रारीत माजी लष्करी अधिकारी आदिल रझा यांचेही नाव आहे, जे नंतर YouTuber झाले.

याशिवाय, अँकर सय्यद हैदर रजा मेहदी यांनाही अटक करण्यात आली आहे. हे लोक लष्करी संघटनांवर हल्ला करण्यासाठी लोकांना भडकावत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. दहशतवाद (Terrorism) पसरवून या लोकांनी देशातील वातावरण बिघडवले होते.

Pakistan Army
Pakistan Political Crisis: इम्रान खानला आणखी एक मोठा झटका, पीटीआय अध्यक्ष परवेझ इलाही यांना अटक

सोशल मीडियावरुन 'ओळख'

ज्या व्यक्तीने कथितपणे एफआयआर (FIR) दाखल केला आहे, तो म्हणतो की, त्याने या लोकांना त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल पाहून ओळखले आहे. या सर्व लोकांनी संपूर्ण योजनेतर्गंत कट रचला आणि सरकारच्या विरोधात काम करणाऱ्यांना मदत केली.

या लोकांनी बंड सुरु करुन लष्कराला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. या व्यक्तीने पुढे असेही म्हटले आहे की, या लोकांना लष्कराला कमकुवत करुन दहशतीचे वातावरण निर्माण करायचे होते.

कोण आहेत हे दोन पत्रकार

शाहीन शाहबाई गेल्या 50 वर्षांपासून पाकिस्तानात पत्रकारिता करत आहेत. ते उघडपणे सध्याच्या सरकारला 'माफिया' म्हणतात. तर इम्रान खान यांना खुला पाठिंबा देतात. बंदुकीच्या जोरावर येथे दडपशाही केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वजाहत एस. खान पत्रकार असण्यासोबतच प्राध्यापकही आहेत. सोशल मीडियावर त्यांचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पाकिस्तान सरकारच्या विरोधातही ते उघडपणे बोलतात.

Pakistan Army
Pakistan Political Crisis: 'बाऊन्सर'... 'यॉर्कर'... 'गुगली'! पाकिस्तानातील सत्तेचा खेळ राजकीय पटलावर रंगला

जनरल बाजवा यांना 'देशद्रोही'

सय्यद हैदर रझा मेहदी हे पाकिस्तानचे सुप्रसिद्ध अँकर आहेत, जे सातत्याने निर्भयपणे लष्कराचे भयानक सत्य समोर आणत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना 'देशद्रोही' म्हटले होते.

आयएसआय आणि लष्कराच्या सांगण्यावरुन अनेक पक्ष स्थापन करण्यात आले आहेत, जेणेकरुन ते आपली सत्ता चालवू शकतील, असेही ते म्हणाले होते.

Pakistan Army
Pakistan Political Crisis: इम्रान खान यांच्या घरातून 14 दहशतवाद्यांना अटक; शाहबाज सरकारचा दावा

पाकिस्तानी जनरलला 'हुकूमशहा' म्हटले होते.

आदिल रझा @soldierspeaks नावाने YouTube चॅनल चालवतात. ते स्वत:ला पाक लष्कराचे माजी मेजर असल्याचे सांगतात. त्यांच्या प्रोफाइलनुसार, ते युद्धात जखमी झाले होते आणि आता ते स्वतंत्र पत्रकार आहेत.

ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महासंघाचे सदस्यही आहेत. आपल्या चॅनल आणि ट्वीटच्या माध्यमातून ते थेट लष्करावर हल्लाबोल करतात. अटक होण्यापूर्वीच त्यांनी पाकिस्तानी जनरल आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या हुकूमशहांपेक्षा वाईट असल्याचे ट्वीट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com