China President Xi Jinping Twitter/ ANI
ग्लोबल

China President Xi Jinping: शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष

China President Xi Jinping: शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

दैनिक गोमन्तक

China Xi Jinping: शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. आपल्या नियुक्तीपूर्वीच शी जिनपिंग यांनी त्यांच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांना सीपीसी बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा चीनची सत्ता काबीज केली आहे. आठवडाभर चाललेल्या 20 व्या CPC राष्ट्रीय काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला, ज्यामध्ये 2,296 प्रतिनिधींनी 205 सदस्यीय केंद्रीय समितीची निवड केली.

दरम्यान, चीनचे (China) सर्वात शक्तिशाली नेते म्हणून शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी पदभार स्वीकारला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या सर्वात शक्तिशाली पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली आहे. चीनमधील सत्तेची चावी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. हा पक्ष चिनी सैन्याचेही नेतृत्व करतो.

शी जिनपिंग हे तिसर्‍यांदा सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत, असे एएफपीने चिनी माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे. ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी रविवारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी शी जिनपिंग म्हणाले की, "तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संपूर्ण पक्षाचे मनापासून आभार मानू इच्छितो."

माजी अध्यक्षांना बैठकीतून हाकलण्यात आले

याआधी शनिवारी 20 वी काँग्रेस चर्चेत आली जेव्हा माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांना बैठकीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. जिंताहो राष्ट्राध्यक्ष शी यांच्या शेजारी बसले होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की, 'कसे दोन लोक प्रथम जिंताओ यांना काहीतरी बोलतात आणि नंतर त्यांना हाताला धरुन उठवतात. तेथून निघताना जिंताओ शी यांना काहीतरी बोलताना दिसत आहेत.'

पंतप्रधान ली केकियांग यांच्या बाजूने

शी जिनपिंग यांनी यापूर्वी क्रमांक दोनचे नेते पंतप्रधान ली केकियांग यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी केली होती. ली हे जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. अशा प्रकारे शी यांनी आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT