China News: जिनपिंग यांच्या विरोधात चीनमध्ये उठला आवाज, निषेधावर कारवाई

Chinese President Xi Jinping: बीजिंगमधील एका चौकात बॅनर लावून कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केल्याचे वृत्त समोर आले आहे.
Chinese President Xi Jinping
Chinese President Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

Chinese President Xi Jinping: बीजिंगमधील एका चौकात बॅनर लावून कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर मात्र, इंटरनेट सेन्सॉरने गुरुवारी सोशल मीडियावरील अशा पोस्ट काढून टाकल्या. चीनमध्ये बंदी घातलेल्या ट्विटरील फोटोमध्ये रस्त्यावरील आगीतून धूर निघत असल्याचे दिसून आले आहे. कठोर "शून्य कोविड" धोरण संपविण्याचे आवाहन करणारे बॅनर आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांना पदच्युत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दुकानाला घेराव घातला

चीनमध्ये (China) राजकीय निषेध दुर्मिळ आहे. रविवारपासून सुरु होणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख अधिवेशनासाठी या आठवड्यात पोलिस हाय अलर्टवर आहेत. मात्र हे बॅनर कोणी लावले असतील किंवा कधी लावले असतील हे स्पष्ट झालेले नाही. चीनी पोलिसांनी (Police) संपूर्ण परिसराला वेढा घातला. अनेकवेळा ते ये-जा करणाऱ्यांना थांबवून विचारपूस करतानाही दिसले. विशेष म्हणजे, असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांची चौकशीही करण्यात आली.

Chinese President Xi Jinping
China Military Coup: चीनमध्ये सत्तांतर झालं का? हे सत्य आता आलं समोर

तसेच, चीनच्या लोकप्रिय वेइबो सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर "हाइडियन हॅशटॅग" असलेली पोस्ट त्वरित ब्लॉक करण्यात आली. काही पोस्ट्समध्ये या घटनेचा थेट उल्लेख न करता दुजोरा देण्यात आला आहे. दुसरीकडे, अज्ञात व्यक्तीच्या धाडसाचे कौतुकही केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com