China-Taiwan Crisis: तैवानवर हल्ला केल्यास चीनला भीषण संकटाला तोंड द्यावे लागेल

तैवानच्या सुरक्षा अधिकारी चेनमिंग यांचा ईशारा; चीन तैवानसोबत युद्ध जिंकू शकत नाही
China-Taiwan
China-TaiwanDainik Gomantak

China-Taiwan Crisis: तैवानच्या राष्ट्रीय सुरक्षा ब्युरो प्रमुख चेनमिंग तोंग यांनी, चीन आमच्यासोबत युद्ध जिंकू शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. तसेच जर चीनने तैवानवर हल्ला करण्याच्या धमक्यांवर अंमलबजावणी केली तर त्यांना भीषण संकटाला तोंड द्यावे लागेल.

China-Taiwan
FATF Meeting: 'एफएटीएफ'च्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर पडणार?

चीन तैवानसोबत युद्ध जिंकू शकत नाही. कारण जर क्षी जिनपिंग यांनी तैवानवर हल्ला केला तर त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंधांना तोंड द्यावे लागेल. राजकीयदृष्ट्याही चीनला वेगळे पाडले जाईल. याचा परिणाम चीनच्या अर्थकारणावर होईल. एकंदरीत चीनला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. तैवानवर बलाचा प्रयोग करून चीनला काहीही लाभ होणार नाही. चीन जगापासून वेगळा पडेल. क्षी जिनपिंग याची प्रतिमाही खराब होईल. आणि चिनी नागरिकांसाठी ते व्हिलन ठरतील, असे चेनमिंग यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये झालेल्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या 20 व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपिंग यांनी म्हटले होते की, तैवानचा प्रश्न सोडविणे हे चिनच्या लोकांवरच अवलंबून आहे. त्यासाठी चीन बलाचा वापरही करेल.

China-Taiwan
Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

त्यापुर्वी तैवानने म्हटले होतेकी, तैवानचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी तैवान कधीही मुल्यांशी तडजोड करणार नाही.

तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयानेही म्हटले होते की, आमच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने सर्वत्र निगराणी ठेवली आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. यापुढेही सर्व घटनाक्रमावर आमची नजर असणार आहे. तैवानच्या जनतेला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व प्रिय आहे. दरम्यान, तैवान हा सेमीकंडक्टरचे उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्याचा वापर बहुतांश इलेक्ट्रिक वस्तुंमध्ये होत असतो. त्यासाठी चीनही काही प्रमाणात तैवानवर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com