China Military Coup: चीनमध्ये सत्तांतर झालं का? हे सत्य आता आलं समोर

Xi Jinping Missing: चीनने लष्करी बंडाच्या अफवा निराधार असल्याचे म्हटले आहे.
Chinese President Xi Jinping
Chinese President Xi Jinping Dainik Gomantak

China News: चीनने लष्करी बंडाच्या अफवा निराधार असल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍यांच्या गटाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्यानंतर शी यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची एक विचित्र अफवा नाकारण्यात आली, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे.

दरम्यान, चीनी न्यायालयाने गेल्या आठवड्यात सार्वजनिक सुरक्षा विभागाचे माजी उपमंत्री सन लिजुन, माजी न्यायमंत्री फू झेंघुआ, शांघाय, चोंगकिंग आणि शांक्सीच्या माजी पोलीस प्रमुखांना भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाखाली तुरुंगात टाकले. त्यानंतर, फू आणि पोलिस (Police) प्रमुखांवर राजकीय गटाचा भाग असल्याचा आणि शी जिनपिंग (Xi Jinping) यांचा विश्वासघातक केल्याचा आरोप करण्यात आला.

Chinese President Xi Jinping
China President Xi Jinping: शी जिनपिंग नजरकैदेत? चीनमध्ये चर्चेला आलं उधाण

दुसरीकडे, भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरु केल्यानंतर पक्षाच्या आणि लष्करी आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शी यांची पुनर्नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमांनी रविवारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) केंद्रीय समितीच्या प्रतिनिधींची यादी जाहीर केली, ज्यांची संख्या 2,300 होती.

Chinese President Xi Jinping
China Vs America: तैवान करणार अमेरिकेकडून शस्त्र खरेदी, ड्रॅगन म्हणाला...

शी यांना SCO शिखर परिषदेत पाहिले गेले

त्याच वेळी, एक तज्ज्ञ आदिल ब्रार यांचे मते, चीनमध्ये कोविड प्रोटोकॉल अधिक कठोर केले गेले असावे आणि जीरो कोविड पॉलिसीनुसार शी जिनपिंग यांना विलगीकरणात ठेवण्याची शक्यता जास्त आहे. झिरो कोविड पॉलिसी अंतर्गत बाहेरुन येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला क्वारंटाईनमध्ये जावे लागते. विशेष म्हणजे, उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत शी जिनपिंग यांना शेवटच्या वेळी सार्वजनिकरित्या पाहिले गेले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हेही या शिखर परिषदेत सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com