Chinese doctors perform double thigh replantation on 51-year-old worker Dainik Gomantak
ग्लोबल

China Medical Miracle: जगातील पहिले 'डबल थाई रिप्लांटेशन' यशस्वी! अपघातात मांड्यांपासून तुटलेले दोन्ही पाय पुन्हा जोडले; 51 वर्षीय कामगारावर चीनमध्ये सुपर सर्जरी

Double Thigh Replantation Surgery China: चीनच्या डॉक्टरांनी वैद्यकीय जगतात एक असा अभूतपूर्व चमत्कार करुन दाखवला, ज्याची चर्चा आता जगभरात सुरु आहे.

Manish Jadhav

Double Thigh Replantation Surgery China: एखाद्या भीषण अपघातात माणसाचे दोन्ही पाय मांड्यांपासून तुटले, तर तो कधी पुन्हा स्वतःच्या पायांवर उभा राहू शकेल का? असा प्रसंग ओढवल्यास सहसा उत्तर 'नाही' असेच असते. मात्र, चीनच्या डॉक्टरांनी वैद्यकीय जगतात असा एक अभूतपूर्व चमत्कार करुन दाखवला, ज्याची चर्चा आता जगभरात सुरु आहे.

चीनमधील जिआंगसू प्रांतातील सुझोऊ शहरात एका 51 वर्षीय फॅक्टरी वर्करचे (मिस्टर जिआंग) भीषण अपघातात दोन्ही पाय मांड्यांपासून तुटले, मात्र तब्बल 20 डॉक्टरांच्या टीमने अत्यंत गुंतागुंतीची 'मायक्रोसर्जरी' करुन त्यांचे दोन्ही कापलेले पाय यशस्वीरीत्या पुन्हा जोडून त्यांना नवजीवन दिले. दोन्ही मांड्यांचे एकाच वेळी यशस्वी रिप्लांटेशन करण्याची जगातील ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरली. अपघात झाल्यानंतर मिस्टर जिआंग यांना तातडीने सुझोऊ रुईहुआ ऑर्थोपेडिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्थितीचे गांभीर्य ओळखून तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने हार न मानण्याचा निर्णय घेतला. तासंतास चाललेल्या या मायक्रोसर्जरीमध्ये डॉक्टरांनी केवळ हाडे जोडली नाहीत, तर रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि स्नायू अत्यंत बारीक-सारीक दृष्टीने पूर्ववत जोडले.

ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतरही पुढील 20 महिने या रुग्णासाठी अत्यंत वेदनादायी आणि संघर्षाचे होते. त्वचेच्या मृत पेशी दुरुस्त करणे, हाडे जोडण्यासाठी बोन ग्राफ्टिंग करणे आणि मेटल प्लेट्स बसवणे अशा अनेक टप्प्यांमधून त्यांना जावे लागले. डॉक्टरांचे प्रयत्न आणि रुग्णाचा प्रचंड संयम यामुळे अपघातानंतर 3 महिन्यांनी त्यांच्या पायांत संवेदना परत येऊ लागल्या. तब्बल 20 महिन्यांच्या कठीण रिहॅबिलिटेशन आणि फिजियोथेरेपीनंतर आज मिस्टर जिआंग वॉकरच्या साहाय्याने स्वतःच्या पायांवर चालत आहेत आणि रोजची कामे स्वतः करत आहेत.

चीनमधील (China) जिआंगसू ट्रॉमा अँड ट्रीटमेंट असोसिएशनने या घटनेची घोषणा केली असून, मायक्रोसर्जिकल ट्रॉमा तंत्रज्ञानात हा जगातील एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे. अपघातात आपले अवयव गमावलेल्या जगभरातील लाखो लोकांसाठी ही घटना आशेचा एक नवा किरण ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT