China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test: चीनने जगातील सर्वात मोठे 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट' तयार करुन त्याची यशस्वी चाचणी पूर्ण केली.
China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test
China Artificial SunDainik Gomantak
Published on
Updated on

China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test: जगातील वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि स्वच्छ तसेच स्वस्त ऊर्जेचा शोध घेण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील असताना चीनने या क्षेत्रात एक मोठी आणि ऐतिहासिक यशोगाथा रचली. चीनने जगातील सर्वात मोठे 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट' तयार करुन त्याची यशस्वी चाचणी पूर्ण केली. तब्बल 582 टन वजनाचे हे महाकाय मॅग्नेट चीनच्या 'आर्टिफिशियल सन' (कृत्रिम सूर्य) या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सर्वात मुख्य आणि पायाभूत भाग मानले जात आहे.

या क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्यात कोणतेही कार्बन उत्सर्जन किंवा प्रदूषण न करता अफाट प्रमाणात वीज तयार करणे शक्य होणार असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. या अभूतपूर्व यशामुळे हरित व स्वच्छ ऊर्जेच्या जागतिक शर्यतीत चीनने इतर सर्व देशांना मागे टाकत आघाडी घेतली असून, 2030 पर्यंत या तंत्रज्ञानातून प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरु करण्याचे चीनचे लक्ष्य आहे.

China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test
China Taiwan Tension: चीननं तैवानला घेरलं! समुद्रात युद्धनौका अन् आकाशात फायटर जेट्स; युद्ध पेटणार?

'आर्टिफिशियल सन' म्हणजेच कृत्रिम सूर्य हा एक असा फ्यूजन रिॲक्टर आहे, जो हुबेहूब सूर्याच्या केंद्रकाप्रमाणे ऊर्जा निर्माण करतो. यामध्ये हायड्रोजनच्या अणूंचे अत्यंत उच्च तापमानावर फ्यूजन केले जाते, ज्यातून कार्बनमुक्त आणि अथांग ऊर्जा बाहेर पडते. चीनने तयार केलेले हे नवीन मॅग्नेट 21 मीटर लांब, 12 मीटर रुंद आणि इंग्रजी 'D' आकाराचे आहे. रिॲक्टरच्या आत सुमारे 10 कोटी अंश सेल्सिअस तापमानावर असणाऱ्या अत्यंत धगधगत्या प्लाझ्माला सुरक्षितपणे नियंत्रित ठेवणे हे या मॅग्नेटचे मुख्य काम आहे.

China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test
China Fire Tragedy: चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

यासोबतच वैज्ञानिकांनी एका विशेष 'सेंट्रल सोलेनॉइड कॉइल'ची देखील यशस्वी चाचणी घेतली, जी फ्यूजन प्रक्रिया सुरु ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे हे संपूर्ण तंत्रज्ञान चीनने पूर्णपणे स्वदेशी संसाधनांच्या जोरावर विकसित केल्याचा दावा केला.

चीनने (China) या क्षेत्रासाठी एक प्रदीर्घ आणि काटेकोर आराखडा आखला आहे. 2027 पर्यंत नवीन फ्यूजन रिॲक्टर पूर्णपणे तयार करणे आणि 2030 पर्यंत जगातील पहिली फ्यूजन वीज तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यानंतर जगातील पहिले 'फ्यूजन डेमॉन्स्ट्रेशन पॉवर स्टेशन' उभारण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. यापूर्वी चीनच्या 'EAST' या रिॲक्टरने 10 कोटी अंश सेल्सिअस तापमानावर 1066 सेकंदांपर्यंत प्लाझ्मा टिकवून ठेवून जागतिक विक्रम नोंदवला होता.

China Artificial Sun Superconducting Fusion Magnet Test
China Warns India :PM मोदींच्या दलाई लामांना शुभेच्छा, चीन भारतावर नाराज; म्हणाला की, 'तिबेटसंबंधी मुद्द्यांची संवेदनशीलता समजून घ्यायला हवी..'

अर्थात, या तंत्रज्ञानातून प्रत्यक्ष वीज वापरण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा यांचा ताळमेळ बसवणे अशी काही आव्हाने अद्याप बाकी असली, तरी चीनचे हे पाऊल मानवाच्या भविष्यातील स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने पडलेले सर्वात मोठे आणि क्रांतिकारी पाऊल ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com