आजच्या काळात परफेक्ट पार्टनर शोधणं खूप कठीण झालं आहे. त्यामुळे लाखो लोक टिंडर, हिंज, बंबल अशा प्लॅटफॉर्मवर जातात. प्रत्येकजण रोमँटिक जोडीदाराच्या शोधात असतो. परंतु लोक हे विसरतात की या डेटिंग अॅप्सवर एखाद्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, कारण त्यांची ओळख पटववणे कठीण असते.
अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला फसवलेही जाऊ शकते. यातच, मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका 42 वर्षीय महिलेने आपल्या आयुष्यभराची बचत गमावली जेव्हा टिंडर मॅच स्कॅमर निघाला.
डेली मेलच्या बातमीनुसार, रेबेका होलोवे नावाची महिला तिच्या दुसऱ्या लग्नानंतर घटस्फोटातून सावरत होती. रेबेका तीन मुलांची आई आहे. तिने टिंडरवर आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधण्याचा निर्णय घेतला. तिला तिथे पुन्हा प्रेम मिळेल असे वाटले.
ती टिंडरवरील एका व्यक्तीशी बोलू लागली. त्याने तिला त्याचे नाव फ्रेड असे सांगितले. तो एक फ्रेंच व्यापारी आहे. तो तिच्याशी अनेकदा टेक्स्ट मेसेजवर बोलत असे. मात्र, व्हिडीओ कॉलवर तो चेहरा दाखवण्यास टाळाटाळ करत असे.
रेबेकाने डेली मेलला सांगितले की, 'मागे वळून पाहताना ही फसवणूक झाल्याचे संकेत मिळतात. पण त्यावेळी आपण यावर विश्वास ठेवतो.'
ती पुढे म्हणाली, 'माझ्या वयाच्या महिला मनाने खूप हळव्या असतात. आपल्याकडे खूप पैसा आहे, पण परफेक्ट जोडीदार मिळत नाही. अचानक एखादा चांगला दिसणारा व्यक्ती तुमच्याशी बोलू लागतो तेव्हा खूप छान वाटतं.
मात्र, यामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी, त्या व्यक्तीने मला सांगितले की, त्याला एक मुलगी आहे आणि तो फिलाडेल्फियामध्ये राहतो. वेळ जस-जसा निघून गेला तस-तसे त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. त्यानंतर फ्रेडने रेबेकाला त्याच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) गुंतवणुकीबद्दल सांगण्यास सुरुवात केली आणि शेवटी तिला त्यात गुंतवणूक करण्यास राजी केले.
पहिल्यांदा, फ्रेडने रेबेकाला बनावट क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मवर $1,000 ची गुंतवणूक करण्यास राजी केले आणि रेबेकाने तिच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर (Investment) $168 कमावले. तिला फायदा होताच, तिचा या प्लॅटफॉर्मवर विश्वास निर्माण झाला.
विशेष म्हणजे, यामध्ये फ्रेडवरही तिचा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर तिने $6,000 ची गुंतवणूक केली आणि त्याचा परतावा वाढतच गेला. श्रीमंत होण्याच्या नादात, रेबेकाने तिच्या आयुष्याची $401,000 (USD 100,000) ची कमाई प्लॅटफॉर्मवर गुंतवली, मात्र तिच्या बँक खात्यात मिळणारा परतावा ट्रान्सफर करु शकली नाही.
तिने डेली मेलला असेही सांगितले की, जेव्हा एका मित्राने तिला अशा प्रकरणांमध्ये अलीकडील वाढीबद्दल सांगितले तेव्हाच तिला समजले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.