America Dainik Gomantak
ग्लोबल

America: डिहायड्रेशन झाले म्हणून पिले खूप पाणी; अमेरिकेत दोन मुलांच्या आईचा मृत्यू

अ‍ॅशले समर्स नावाच्या या महिलेचा वीकेंड ट्रिप दरम्यान अचानक मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पाणी म्हणजे जीवन, जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. प्रत्येक व्यक्तीने दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. परंतु काहीवेळा जास्त प्रमाणात पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. नुकतेच एका महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.

अ‍ॅशले समर्स नावाच्या या महिलेचा वीकेंड ट्रिप दरम्यान अचानक मृत्यू झाला. अ‍ॅशले, 35, तिचा नवरा आणि त्यांच्या दोन मुली, वयाच्या 8 आणि 3 सह दोन दिवसांच्या वीकेंडला गेली होती, शेवटच्या दिवशी ती अचानक आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या इंडियाना राज्यात ही घटना घडली.

अ‍ॅशलेने इंडियाना प्रवासादरम्यान बरीच बोटिंग केली. प्रवासादरम्यान, अ‍ॅशलेला डिहायड्रेशनचा खूप त्रास होऊ लागला आणि त्यामुळे तिला वारंवार डोकेदुखी होत होती. शरीराला हायड्रेट करण्यासाठी, अ‍ॅशले काही मिनिटांत सुमारे 2 लिटर पाणी प्यायली.

अ‍ॅशलेने अवघ्या 20 मिनिटांत 4 बाटल्या पाणी प्यायल्याचे सांगितले जात आहे. सहसा, एवढ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संपूर्ण दिवस लागतो, परंतु अ‍ॅशलेने काही मिनिटांत इतके पाणी प्याले.

जास्त पाणी प्यायल्यानंतर अ‍ॅशले अचानक कोसळली, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत अधिक बिघडल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथून ती परत आलीच नाही. अ‍ॅशलेच्या अचानक मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

अ‍ॅशलेच्या मेंदूला सूज आल्याने शरीराच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबला होता. पाण्याच्या विषारीपणाची समस्या अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पीते तेव्हा अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

जास्त पाणी प्यायल्याने त्यातील इलेक्ट्रोलाइट्स रक्तात पातळ होतात. त्यानंतर - उलट्या, डोकेदुखी, गोंधळ, थकवा, मळमळ असे प्रकार घडतात.

पाण्याऐवजी अ‍ॅशलेने दुसरे काहीतरी प्यायले असते किंवा हळूहळू पाणी प्यायले असते तर कदाचित ती आज जिवंत असती. असे तिची कुटुंबीय म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT