जेफ बेझोस यांचे अवकाश पर्यटन यशस्वी  Dainik Gomantak
ग्लोबल

जेफ बेझोस यांनी अवकाश सफारीसाठी 20 जुलै हीच तारीख का निश्‍चित केली?

11 मिनिटाच्या प्रवासात जेफ बेझोस यांची अवकाशाला गवसणी; ‘न्यू शेफर्ड’मधून पहिले अवकाश पर्यटन यशस्वी

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: ‘ॲमेझॉन’चे संस्थापक आणि माजी ‘सीईओ’ जेफ बेझोस (Jeff Bezos CEO of Amazon) यांनी काल मंगळवारी न्यू शेफर्ड (New Shepherd) कुपीत बसून अवकाश सफर (Space travel)केली. मागील आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी वयाच्या 70व्या वर्षी पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ (VVS Unity) या विमानातून अवकाशात उड्डाण केले होते. त्यांनी अवकाश पर्यटन क्षेत्राची दारे किलकिली केली होती, ती जेफ बेझोस यांच्या उड्डाणानंतर ती आणखी उघडली गेली आहेत. (Why did Jeff Bezos set July 20 as the date for the Space travel)

बेझोस यांच्या अवकाश सफरीबरोबर त्यांचे भाऊ मार्क बेझोस, ‘नासा’च्या माजी महिला अंतराळवीर वॅली फंक (वय 82) आणि वैमानिक ऑलिव्हर डेमेन (वय 18) यांनी अंतराळ सफारीचा अनुभव घेतला. बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या माध्यमातून ही अवकाश पर्यटन मोहीम राबविली गेली होती. ‘न्यू शेफर्ड’ कुपीतून या अवकाश पर्यटकांनी शून्य सफारीसाठी 20 जुलै ही तारीख निश्‍चित करण्यामागे एक विशेष कारण होते. ते म्हणजे 52 वर्षांपूर्वी अपोलो 11 हे अवकाश यान याच दिवशी चंद्रावर उतरले होते.

उड्डाणानंतर...

  • आवाजाच्या तीनपट वेगाने म्हणजेच एक हजार 29 मीटर प्रति सेकंद वेगाने ‘न्यू शेफर्ड’ रॉकेटची अवकाशाकडे झेप होती

  • रॉकेटचा वेग ताशी तीन हजार 704 किलोमीटर असल्याने रॉकेट वेगाने अवकाशात पोचले

  • यानंतर एका मिनिटात रॉकेट कुपीपासून वेगळे झाले

  • अवकाशात गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने मोठ्या उंचीपर्यंत कुपी पोचल्यावर प्रवाशांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला

  • जमिनीवर उतरताना...

  • अंतराळात पोहचण्याच्या नऊ मिनिटांनंतर कुपीचा परतीचा प्रवास सुरू झाला

  • कुपीचा वेग कमी करण्यासाठी पॅरेशूट उघडण्यात आले होते

  • पॅरेशूट उघडल्यानंतर हा वेग 26 किलोमीटर प्रतितासावरून 1.6 किलोमीटर झाला

  • अशा कमी वेगात ही कुपी जमिनीवर उतरली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT