Pegasus प्रकरणात फ्रान्स करणार चौकशी

पेगासेस(Pegasus) या फोन टॅपिंग(Phone Tapping) प्रकरणाणे खूप मोठी खळबळ देशासह जगातील इतर देशातही उडालेली पाहायला मिळत आहे
France to investigate Pegasus case
France to investigate Pegasus caseDainik Gomantak
Published on
Updated on

भारतासह(India) जगातील अनेक देश 2 दिवसांपासून केवळ एका सॉफ्टवेअरमुळे हादरले आहेत. पेगासेस(Pegasus) या फोन टॅपिंग(Phone Tapping) प्रकरणाणे खूप मोठी खळबळ देशासह जगातील इतर देशातही उडालेली पाहायला मिळत आहे, भारतात तर या प्रकरणाचे पडसाद संसदेपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे आता आता फ्रान्सने(France) पेगासस फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया कंपन्यांनी जे उघड केले आहे त्यानुसार, सुमारे 1000 फ्रेंच लोकांना लक्ष्य केले गेले आणि त्यांनी पेगासस स्पायवेअरचा वापर करून त्यांचे फोन टॅप केले.मिळालेल्या माहितीनुसार, मोरोक्कोच्या एजन्सीने पेगाससद्वारे सुमारे 1000 फ्रेंच लोकांना लक्ष्य केले. यामध्ये 30 पत्रकार आणि इतर माध्यम व्यक्तींचा समावेश आहे त्यामुळेच ही चौकशी होणार आहे.

France to investigate Pegasus case
"भारतच अफगाणिस्तानचा खरा मित्र"

ज्या पत्रकारांचे फोन टॅप केले गेले त्यामध्ये ले मॉंडे, ले कॅनार्ड एन्चेनी, ले फिगारो, एजन्सी फ्रान्स-प्रेसे आणि फ्रान्स टेलिव्हिन्स यांचा समावेश आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण तपासात फ्रान्सला गुंतलेल्या कंपनीशी संबंधित पत्रकाराचा फोनही हॅक करण्यात आला होता.आता या चॊकशीतून नेमके काय बाहेर येते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

या प्रकरणाचे पडसाद भारतातही मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत, भारतात अनेक पत्रकार, काही मोठे व्यापारी याबरोबरच राहुल गांधी यांचेही फोन टॅपिंग झाला असल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे आणि यामुळेच विरोधकांनी आता सरकारला धारेवर धरले आहे. या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सतत गदारोळ सुरू आहे. त्याचबरोबर सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही हेरगिरीमध्ये सामील नाहीत, हे आरोप केवळ प्रतिमा खराब करण्यासाठी करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com