अमेरिकेचे माजी अध्यक्ष(Us President) डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या उद्घाटन समितीचे अध्यक्ष आणि ट्रम्प यांच्या जवळचे अब्जाधीश मित्र टॉम बॅरॅक(Thomas Barrack) यांना परकीय लॉबींगच्या(undisclosed lobbying) आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी दिली आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील सरकारच्या सार्वजनिक व्यवहार कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बॅरॅक यांना संयुक्त अरब अमिरातीच्या हितसंबंधांना पुढे आणण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न करत सरकारच्या सात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात आरोप ठेवण्यात आला होता.
“विरोधकांनी वारंवार बॅरेकच्या मैत्रीचे भांडवल केले आणि शेवटी अध्यक्ष, उच्चपदस्थ मोहीम आणि सरकारी अधिकारी म्हणून निवडले गेलेले उमेदवार आणि अमेरिकन प्रसारमाध्यमे त्यांची खरी निष्ठा न जपता आणि आमचे नियम न पाळता परदेशी सरकारची धोरणे ध्येय पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या उमेदवारापर्यंत ते पोहचले,” असा आरोप यूएस अॅटर्नी जनरल मार्क लेस्को यांनी लावला आहे.
त्यासोबतच अमेरिकेने बॅरेकच्या गुंतवणूकीतील कंपनीचे कर्मचारी मॅथ्यू ग्रिमस आणि युएईचे राष्ट्रीय सहकारी राशीद अल मलिक यांनाही शुल्क आकारले असून अमेरिकन सरकारचा आरोप आहे की युएई सरकार गुप्तपणे काम करीत आहे.
तर दुसरीकडे मी बॅरेक निर्दोष आहेत हे सिद्द्ध करेन तसेच त्यांनी सुरुवातीपासूनच सरकारी तपासाला सहकार्य केले असल्याची माहिती टॉम बॅरॅक यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर बॅरेकने अल मलिक यांना ट्रम्प प्रशासनाकडू अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या लक्ष्यांची “इच्छा यादी” तयार करण्यास सांगितले होते आणि त्याचाच वापर त्यांची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी होत होता.
युएईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हाइट हाऊसच्या बैठकीनंतर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जन-सार्वजनिक मते सामायिक करण्यास बॅरेकने सहमती दर्शविली असल्याचा आरोपही न्याय विभागाने केला आहे. तसेच डीओजेच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर २०१७ मध्ये अल-मलिक यांच्या आग्रहानुसार बॅरेकने ट्रम्प यांना युएई आणि सौदी अरेबियाने कतारच्या नाकाबंदीबाबत संबोधित करण्यासाठी कॅम्प डेव्हिड येथे प्रस्तावित शिखर परिषदेचे आयोजन करण्यासही सांगितले होते. आणि ही सगळी माहिती देवाण घेवाण करण्यासाठी बॅरेकने युएईतिल अधिकाऱ्यांशी बेकायदेशीर संर्पक ठेवला होता.
बॅरेक ही खासगी इक्विटी कंपनी कॉलनी कॅपिटलची संस्थापक आहे. एप्रिलमध्ये त्यांनी या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पद सोडले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.