PM Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार?

इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागत आहे. रविवारी झालेल्या मतदानानंतर इम्रान खान पंतप्रधानपदावर राहणार की त्यांच्या जागी आणखी कोणी सत्ता हस्तगत करणार हे स्पष्ट होईल.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली आहे. नॅशनल असेंब्लीत त्यांच्यावर अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागत आहे. रविवारी झालेल्या मतदानानंतर इम्रान खान पंतप्रधानपदावर राहणार की त्यांच्या जागी आणखी कोणी सत्ता हस्तगत करणार हे स्पष्ट होईल.(Who will be the Prime Minister of Pakistan)

इम्रान खान यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना आपण राजीनामा देणार नसून शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार असल्याचे स्पष्ट केले. इम्रान खान यांना खुर्ची वाचवण्यासाठी 342 पैकी 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांचा दावा आहे की, त्यांना 175 खासदारांचा पाठिंबा असून पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा. आता अशा परिस्थितीत इम्रान खान पंतप्रधानपदावरून (Prime Minister) पायउतार झाले तर त्यांची जागा कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे आम्ही तुम्हाला या पदासाठी पहिल्या तीन दावेदारांबद्दल सांगणार आहोत.

'देशासाठी काही तरी करण्याची इच्छा असल्यामुळे मी राजकारणात आलो.

इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) म्हणाले, ''देशासाठी काही तरी करण्याची इच्छा असल्यामुळे मी राजकारणात आलो. जगभरात ऐकेकाळी पाकिस्तानच्या गौरवाची कहाणी सांगितली जात होती. मात्र आता मी देशाचे पतन होताना पाहत आहे. आता जगभरात पाकिस्तानचं नाव खराब होत चाललं आहे. पाकिस्तानी जनतेला कुणासमोर झुकण्याची वेळ येऊ देणार नाही. देशाची परराष्ट्र निती पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांसाठी आम्ही राबवण्याचे काम केले. ना कधी मी झुकणार ना माझ्या जनतेला झुकू देणार नाही. वर्ल्ड ट्रेडवर सेंटरवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नव्हता. परंतु ज्यांच्याबरोबर युध्द आपण लढलो त्यांनीच पाकिस्तानवर निर्बंध लावले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT