आखाती देश संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील कठोर कायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोक तुरुंगात आहेत. अनेकांना त्यांच्या सुटकेचा खर्च परवडत नाही त्यामुळे ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात. आता या कैद्यांच्या सुटकेसाठी एक भारतीय उद्योगपती पुढे आला आहे.
भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी 2024 च्या सुरुवातीस UAE च्या तुरुंगातून 900 कैद्यांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी 1 दशलक्ष दिरहम (सुमारे 2.5 कोटी रुपये) दान केले. विशेष म्हणजे, यावर्षी 3,000 कैद्यांची सुटका करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
प्युअर गोल्ड ज्वेलर्सचे मालक 66 वर्षीय फिरोज मर्चंट यांनी UAE अधिकाऱ्यांना 1 दशलक्ष दिरहम दान केले आहेत, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. ते स्वतः दुबईत राहतात. रमजानपूर्वी नम्रता, मानवता, क्षमा आणि दया दाखवण्याचा हा संदेश असल्याचे फिरोज मर्चंट यांच्या कार्यालयाने सांगितले.
दरम्यान, प्रसिद्ध दुबईस्थित भारतीय व्यापारी आणि प्युअर गोल्डचे मालक फिरोज मर्चंट यांनी अरब देशातील तुरुंगातून 900 कैद्यांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी अंदाजे 2.25 कोटी रुपये (AED 1 दशलक्ष) दान केले, असे त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फिरोज मर्चंट त्यांच्या 'द फॉरगॉटन सोसायटी' उपक्रमासाठी ओळखले जातात. 2024 च्या सुरुवातीपासून त्यांनी 900 कैद्यांची सुटका केली आहे.
मॅगल्फ न्यूज पोर्टलनुसार, यात अजमानमधील 495 कैदी, फुजैराहमधील 170 कैदी, दुबईतील 121 कैदी, उम्म अल क्वाइनमधील 69 कैदी आणि रास अल खैमाहमधील 28 कैद्यांचा समावेश आहे. Magalf या ऑनलाइन तेलुगू न्यूज पोर्टलनुसार, फिरोज मर्चंट यांनी त्या कैद्यांचे कर्जही फेडले आणि त्यांना घरी परतण्यासाठी विमान भाडे दिले. कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणे आणि त्यांना आयुष्यात दुसरी संधी देणे हे त्यांचे ध्येय आहे. 2024 साठी त्यांचे लक्ष्य 3,000 हून अधिक कैद्यांना मुक्त करण्यात मदत करणे आहे.
दुसरीकडे, UAE च्या मध्यवर्ती कारागृहातील पोलीस महासंचालकांच्या सहकार्याने, फिरोज मर्चंट यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांत 20,000 हून अधिक कैद्यांना मदत केली आहे. मर्चंट म्हणाले की, "सरकारच्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे. फॉरगॉटन सोसायटीचा असा विश्वास आहे की, ''आम्ही मानवतेसाठी काम करत आहोत. आम्ही या व्यक्तींना त्यांच्या कुटुंब आणि समुदायाशी पुन्हा जोडण्याची संधी देण्यासाठी करत आहोत."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.