UAE, जर्मनी, स्पेनचे पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली; जाणून घ्या भारत आणि शेजारी देशांची स्थिती

World Passport Index Report 2024: गल्फ टुडेच्या अहवालानुसार, यूएईला यादीत पहिले स्थान मिळाले कारण त्यांनी त्यांच्या राजनैतिक धोरणाचा भाग म्हणून इतर देशांशी संबंध मजबूत केले आहेत.
World Passport Index Report 2024
World Passport Index Report 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

World Passport Index Report 2024: जगभरातील पासपोर्टचे अध्ययन केल्यानंतर क्रमवारी प्रकाशित करणाऱ्या आर्टन कॅपिटलने 2024 साठी पहिला पासपोर्ट निर्देशांक जारी केला आहे. निर्देशांकानुसार, UAE पासपोर्टला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टचा किताब मिळाला आहे. UAE पासपोर्टचा मोबिलिटी स्कोअर 180 आहे. गल्फ टुडेच्या अहवालानुसार, यूएईला यादीत पहिले स्थान मिळाले कारण त्यांनी त्यांच्या राजनैतिक धोरणाचा भाग म्हणून इतर देशांशी संबंध मजबूत केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्व देशांचा स्कोअर 178 आहे. म्हणजेच या देशांचे नागरिक 178 देशांमध्ये प्रवास करु शकतात. तिसर्‍या क्रमांकावर फिनलंड, नॉर्वे, स्वीडन यांसारखे बहुतेक युरोपीय देश आहेत. या सर्व देशांचा मोबिलिटी स्कोअर 177 आहे.

World Passport Index Report 2024
World's Most Powerful Passport in 2023: जगातील शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग जाहीर, जपानला मागे टाकत सिंगापूर अव्वल; जाणून घ्या भारताची रॅंकिंग

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे

आर्टन कॅपिटलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, यूएईचे नागरिक 50 देशांना भेट दिल्यानंतर व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 130 देशांमध्ये ते पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करु शकता. या यादीत भारत 66 व्या स्थानी आहे. भारताचा मोबिलिटी स्कोअर 77 आहे, याचा अर्थ भारतीय लोक 77 देशांमध्ये प्रवास करु शकतात आणि 24 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. तर भारताचा शेजारी पाकिस्तान या यादीतील शेवटच्या पाच देशांमध्ये स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचा मोबिलिटी स्कोअर 47 आहे आणि त्याचे नागरिक 11 देशांमध्ये विनाव्हिसा प्रवास करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com