British PM Rishi Sunak  Dainik Gomantak
ग्लोबल

'तुम्ही एलॉन मस्क असोत की अन्य कोणी...', सेमेटिझमवर ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांचा संताप

Antisemitism: जे लोक वांशिक किंवा धार्मिक दृष्ट्या ज्यू आहेत त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रह आणि भेदभाव करणाऱ्यांसाठी सेमिटिझम हा शब्द वापरला जातो.

Ashutosh Masgaunde

'Whether you're Elon Musk or someone else...', British Prime Minister Rishi Sunak's fury over anti-Semitism:

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुन्हा एकदा ज्यू विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ऋषी सुनक यांनी प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांच्यावरही टीका केली.

मात्र, त्यांनी अत्यंत सावध शब्दांत एलॉन मस्क यांच्यावर निशाणा साधला. एका मीडिया चॅनलशी बोलताना सुनक म्हणाले की, मी अर्थातच सेमेटिझमच्या विरोधात आहे.

सुनक यांचे लक्ष्य मस्क

संभाषणादरम्यान, जेव्हा सुनक यांना एलॉन मस्क यांच्या प्रसिद्ध ट्विटबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, 'तुम्ही एलॉन मस्क असाल किंवा कोणी रस्त्यावर कोणाला शिवीगाळ करणारे, याने काही फरक पडत नाही, सेमिटिझम प्रत्येक प्रकारे चुकीचे आहे.'

अलीकडेच इलॉन मस्क हे त्यांच्या एका ट्विटमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आले होते आणि त्यांच्यावर सेमिटिझम भडकावल्याचा आरोप होत आहे.

खरं तर, एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दावा केला होता की, ज्यू लोक गोऱ्या लोकांविरुद्ध द्वेष वाढवत आहेत.

या पोस्टला उत्तर देताना मस्कने लिहिले की, 'तुम्ही खरे खरे बोललात.' या ट्विटनंतर मस्क यांच्यावर टीका होत असून, अमेरिकी सरकारनेही मस्क यांच्यावर टीका केली आहे.

यानंतरच अनेक बड्या कंपन्यांनी मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया कंपनी X वर त्यांची मार्केटिंग मोहीम थांबवली.

संसदेत मस्क यांच्यावर टीका करण्यास नकार

उल्लेखनीय आहे की, नुकतेच सुनक यांनी एका कार्यक्रमात एलॉन मस्क यांच्यासोबत स्टेजही शेअर केला होता. यावरून सुनक यांच्यावर टीकाही झाली होती.

गेल्या आठवड्यात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदाराने ऋषी सुनक यांना सभागृहात मस्क यांच्यावर टीका करण्याबद्दल विचारले होते, परंतु सुनक यांनी तसे करण्यास नकार दिला होता.

सेमेटिझम म्हणजे काय?

जे लोक वांशिक किंवा धार्मिक दृष्ट्या ज्यू आहेत त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रह आणि भेदभाव करणाऱ्यांसाठी सेमिटिझम हा शब्द वापरला जातो.

सेमेटिझममध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि वांशिक विरोधाचाही समावेश होते. सेमेटिझम उघड आणि हिंसक किंवा अधिक सूक्ष्म असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT