फेसबुक (Facebook), WhatsApp आणि इन्स्टाग्राम (Instagram) मागील काही दिवसांपूर्वी अचानक शटडाऊन झाल्यामुळे यूजर्सना मोठे कष्ट सोसावे लागले होते. त्यातच आता WhatsApp यूजर्स एक्सपीरिएंस लवकरच बदलणार आहे. वास्तविक, WhatsApp वापरकर्त्याच्या अभिप्रायावर आधारित व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधा बदलत आहे, ज्यामुळे कोणालाही WhatsApp Voice Note पाठवणे अगदी सोपे होणार आहे. आणि विशेष म्हणजे ते अधिक चांगल्या रितीने काम करेल. मात्र WhatsApp व्हॉइस नोटला वापकर्त्यांकडून अपेक्षेप्रमाणे लोकप्रियता मिळाली नव्हती. याचे एक प्रमुख कारण खराब यूजर एक्सपीरिएंस होता. या पाश्वूभूमीवर WhatsApp व्हॉइस नोट फीचर सुधारत आहे. ज्याद्वारे वापरकर्ते व्हॉट्सअॅपवरुन व्हॉइस नोट्सद्वारे दीर्घ संभाषण करण्याचा आनंद घेऊ शकतात.
प्ले आणि पॉज हा पर्याय व्हॉइस नोटमध्ये उपलब्ध असेल
WhatsApp अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप व्हॉइस रेकॉर्डिंग फीचरमध्ये पॉज ऑप्शन देणार आहे. ज्या अंतर्गत वापरकर्ते ऑडिओ संदेश रेकॉर्ड करताना पॉज देवून नंतर ते रेकॉर्ड करु शकतील. जर आपण सध्याच्या वेळेबद्दल बोललो, तर व्हॉट्सअॅप व्हॉइस नोट फीचरमध्ये, आपल्याला संपूर्ण रेकॉर्डिंग विराम न देता करावे लागते, ज्यामुळे वापरकर्त्यांना ते वापरणे अधिक कठीण होते. आणि वापरकर्त्यांनी पाठवलेल्या WhatsApp Voice Note अपूर्णही राहतात.
आपण व्हॉइस नोट नियंत्रित करु शकाल
व्हॉट्सअॅप सातत्याने व्हॉइस नोट फीचर अपडेट करत आहे. अगदी अलीकडेच व्हॉट्सअॅपने व्हॉइस मेसेज फीचरमध्ये स्पीड कंट्रोलला सपोर्ट केला होता. ज्याच्या मदतीने वापरकर्ते व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज तीन वेगवेगळ्या स्पीडने चालवू शकतील. WhatsApp voice note वैशिष्ट्यात 1x, 1.5x आणि 2x (म्हणजे सामान्य, 1.5x वेगवान आणि 2x वेगवान) स्पीड पर्याय आहेत. पूर्वी, वापरकर्त्यांना केवळ सामान्य वेगाने व्हॉइस नोट संदेश ऐकण्याचा पर्याय होता. तथापि, नवीन बदलांसह, आपण दिर्घकाळ चालणारी व्हॉइस नोट्स पाठवू आणि ऐकता येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.