US Bomb Cyclone Dainik Gomantak
ग्लोबल

'Bomb Cyclone' हे नाव याआधी ऐकले का, ज्याने अमेरिकेचे जनजीवन केले ठप्प!

Bomb cyclone America: अमेरिकेत आस्मानी संकटाने हाहाकार माजवला आहे. यामुळे संपूर्ण देशाचे जनजीवन ठप्प झाले आहे.

दैनिक गोमन्तक

USA Stream Weather: अमेरिकेत आस्मानी संकटाने हाहाकार माजवला आहे. यामुळे संपूर्ण देशाचे जनजीवन ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे, हवाई सेवेसोबतच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. पुढील काही दिवस या आपत्तीतून दिलासा मिळण्याची आशा नाही. दरम्यान, 'बॉम्ब सायक्लोन' या शब्दाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे चक्रीवादळ काय आहे आणि त्याने जगातील सर्वात शक्तिशाली देशाला कसे बर्बाद केले, त्याबद्दल जाणून घेऊया...

बॉम्ब चक्रीवादळ समजून घ्या

बॉम्ब चक्रीवादळ हे वेगाने जाणारे तीव्र वादळ आहे, जे 24 तासांच्या आत 20 मिलीबार किंवा त्याहून अधिक हवेचा दाब निर्माण करते. यावेळी आर्क्टिकमधील हवा मेक्सिकोच्या (Mexico) आखातातून उष्णकटिबंधीय हवेकडे गेली, ज्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

'सीएनएन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हा शब्द पहिल्यांदा 1980 च्या दशकात एका हवामान संशोधन पेपरमध्ये वापरला गेला होता. ज्याचे लेखक एमआयटी हवामानशास्त्रज्ञ फ्रेड सँडर्स आणि जॉन ग्याकुम आणि स्वीडिश हवामान तज्ञ टोर बर्गेरॉन होते. या जोडीने पहिल्यांदा अप्रत्याशित वेगाने खोल होणारे वादळ 24 तासांत 24 mbar चे निकष पूर्ण करणारे वादळ म्हणून परिभाषित केले होते. या वादळाचे अभूतपूर्व स्वरुप त्याच्या कमी तापमानाच्या तीव्रतेमुळे आणि टोकापासून येते.

बॉम्ब चक्रीवादळ प्राणघातक ठरु शकते

यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, यावर्षी विक्रमी थंडी पडत आहे. अमेरिकेतील (America) मिनेसोटामध्ये तापमान उणे 38 अंशांपर्यंत खाली आले आहे. फ्लोरिडामध्ये बर्फवृष्टी सुरुच आहे. अशा थंडीत खबरदारी न घेतल्यास काही मिनिटांत मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

SCROLL FOR NEXT