Cyclone News: अमेरिकेत ख्रिसमस उत्सवावर हिमवादळाचे संकट, जाणून घ्या 'Bomb Cyclone' म्हणजे काय?

ख्रिसमसवर या वादळाने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
Bomb Cyclone | America Cyclone News | US bomb cyclone | Bomb cyclone in US
Bomb Cyclone | America Cyclone News | US bomb cyclone | Bomb cyclone in USDainik Gomantak

America Cyclone : जगभरात ख्रिसमसची धुम सुरु आहे. अमेरिका सध्या चांगलेच गारठले आहे. त्याचा नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. ख्रिसमसवर या वादळाने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. अशा वेळी बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या मोठ्या भागात बर्फाचे वादळ आणि थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या बॉम्ब चक्रीवादळाच्या घटनेला अत्यंत थंड वातावरण जबाबदार आहे. बॉम्ब चक्रीवादळ म्हणजे काय, त्यांचा इतिहास त्यांचे होणारे कोणते हे जाणून घेउया.

बॉम्ब चक्रीवादळ म्हणजे काय?

बॉम्ब चक्रीवादळ किंवा बॉम्बोजेनेसिस एक वेगाने वाढणारे भयंकर चक्रीवादळ आहे. 24 तासांच्या आत हवेचा दाब 20 मिलीबार किंवा त्याहून अधिक वाढल्यावर असे वादळ येते. नॅशनल ओशियानिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते सामान्यतः जेव्हा उबदार हवेचा वस्तुमान थंड हवेशी आदळतो तेव्हा असे होते. या वेळी आर्क्टिकमधील हवा मेक्सिकोच्या आखातातून उष्णकटिबंधीय हवेकडे गेली, ज्यामुळे पाऊस आणि बर्फ येतो.

Bomb Cyclone | America Cyclone News | US bomb cyclone | Bomb cyclone in US
China Corona Update: रक्ताचा तुटवडा, रोजच्या अहवालावर बंदी; चीनमध्ये कोरोनामुळे लोकांचे बुरे हाल

या शब्दाचा इतिहास काय आहे

सीएनएननुसार हा शब्द पहिल्यांदा 1980 च्या दशकात हवामानशास्त्रीय संशोधन पेपरमध्ये वापरला गेला. त्याचे लेखक एमआयटी हवामानशास्त्रज्ञ फ्रेड सँडर्स आणि जॉन गिकम, स्वीडिश हवामानशास्त्रज्ञ टोर बर्गरॉन होते. 24 तासांत 24 मिलीबार निकष पूर्ण करणारे वादळ म्हणून परिभाषित करणारे ते पहिले होते.

या वादळात विशेष काय आहे?

वेदर एनको (Weather'enco) हवामानशास्त्रज्ञ यान एमिस यांच्या मते हे वादळ असाधारण आहे. यामध्ये 24 तासात 40 मिलीबारचे प्रमाण पूर्ण होत आहे. फ्रेंच वेदर चॅनेलचे हवामानशास्त्रज्ञ सिरिल डचेस्ने म्हणाले, “यामुळे कमी दाब प्रणालीच्या केंद्राजवळ अत्यंत वादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादळाचे अभूतपूर्व स्वरूप त्याच्या कमी तापमानाच्या तीव्रतेमुळे आणि टोकापासून येते.

  • वादळाचा परिणाम घातकही ठरू शकतो

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने सांगितले की, थंडीने आधीच विक्रम मोडीत काढला आहे. पश्चिम कॅनडात तापमान उणे 53 अंश सेल्सिअस , मिनेसोटामध्ये उणे 38 आणि डॅलसमध्ये उणे 13 पर्यंत घसरत आहे. उपोष्णकटिबंधीय उत्तर फ्लोरिडामध्ये देखील बर्फ पडत आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने चेतावणी दिली आहे की अशा प्रकारच्या थंडीच्या काही मिनिटांत उघड्या त्वचेवर हिमबाधा होऊ शकते. या अटींचा जास्त काळ संपर्कात राहिल्यास मृत्यूही होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com