US Bomb Cyclone: अमेरिकेत बॉम्ब नावाच्या हिमवादळामुळे भयंकर थंडीची लाट आली असून लाखो नागरिकांना या लाटेचा फटका बसला आहे. या वादळाने जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहेत. अमेरिकेत सर्व महत्वाच्या सेवा ठप्प पडल्या आहेत. येथील न्यूयॉर्क या महत्वाच्या शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
अमेरिकेतील पश्चिमेकडील मोंटाना राज्यात शुक्रवारी पारा उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. वादळामुळे मध्य राज्यांच्या तापमानात घट झाली आहे. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, डेस मोइनेस, आयोवा सारख्या ठिकाणी तापमान उणे 38°C आहे. युएसमधील एक दशलक्षाहून अधिक लोकांना वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला आहे. पाणीपुरवठाही खंडीत झाला आहे. 4,400 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल म्हणाल्या, "आम्ही पूर आणि बर्फ या दोन्हींचा सामना करत आहोत. गोठवणारे तापमान आहे. राज्याच्या काही भागांत पाऊस पडत आहे, ज्यामुळे तापमान झपाट्याने कमी होत आहे.
अमेरिकेतील 70 टक्के लोकसंख्येला या आर्कटिक ब्लास्ट आणि बॉम्ब सायक्लोनचा फटाक बसला आहे. अमेरिकेतील अनेक भागात तापमान उणे 20 ते उणे 36 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. उत्तर ध्रुवावरील आर्कटिक भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हे वादळ उद्भवले आहे. हवामानशास्त्रज्ञ अॅश्टन रॉबिन्सन कुक म्हणतात की, मध्य युनायटेड स्टेट्समधून थंड हवा पूर्वेकडे सरकत आहे आणि येत्या काही दिवसांत सुमारे 135 दशलक्ष लोक थंड वाऱ्यामुळे वाईटरित्या प्रभावित होऊ शकतात.
तापमान इतके कमी होईल की सहन करणे कठीण होईल. बॉम्ब चक्रीवादळात मध्यभागी हवेचा दाब 24 तासांत किमान 24 मिलीबारने कमी होऊ शकतो आणि त्याचा वेग खूप असतो. बॉम्ब चक्रीवादळामुळे परिसरात जोरदार बर्फ पडतो आणि जोरदार वारे वाहतात. हे वादळ सहसा हिवाळ्यात येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.