Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: ‘ती’ म्हणेल तेच खरं! पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडसमोर मित्राला ठरवलं चुकीचं, प्रेमात हरलं लॉजिक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Funny School Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा व्हिडिओ कधी आणि कसा व्हायरल होईल, याचा अंदाज लावता येत नाही.

Manish Jadhav

Funny School Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा व्हिडिओ कधी आणि कसा व्हायरल होईल, याचा अंदाज लावता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ प्रेमात पडलेल्या मुलांची मानसिक अवस्था अत्यंत विनोदी पद्धतीने दाखवतो. यात एका मुलाचा प्रेमापुढे लॉजिक आणि गणित दोन्ही कसे हरले, हे पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय आहे?

दरम्यान, हा व्हिडिओ एका क्लासरुममधील आहे. एक शिक्षक तीन मुलांना फळ्यासमोर उभे करुन त्यांना गुणाकाराचे गणित सोडवायला सांगतात. या तीन मुलांपैकी एक मुलगा, त्याची आवडती मुलगी आणि त्याचा एक मित्र असे तिघेही गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांनी विचारलेले गणित आहे '6 × 4 = ?'

गणित सोडवताना तो मुलगा अडखळतो. तो बाजूला उभी असलेल्या मुलीकडे (Girl) पाहतो आणि तिला उत्तर विचारतो. ती मुलगी त्याला चुकीचे उत्तर सांगते आणि फळ्यावर 21 असे लिहिते. हे पाहताच बाजूला उभा असलेला त्याचा हुशार मित्र लगेच पुढे येतो आणि 21 हे उत्तर खोडून बरोबर उत्तर 24 लिहितो. पण प्रेमात आंधळा झालेला तो मुलगा मित्राने दिलेले बरोबर उत्तर खोडून पुन्हा एकदा 21 हेच चुकीचे उत्तर लिहितो. यामागे त्याचे एकच कारण असते, ते म्हणजे आपल्या आवडत्या मुलीने दिलेले उत्तर बरोबर आहे, हे दाखवणे.

या व्हिडिओमध्ये प्रेमासमोर लॉजिक कसे हरते, हे अगदी स्पष्टपणे दाखवले आहे. तुम्ही कितीही हुशार किंवा कोणत्याही गोष्टीचा तर्क लावण्यात कितीही निपुण असाल, पण जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुमची सर्व हुशारी त्या एका व्यक्तीसमोर हार मानते, हेच या व्हिडिओतून मजेदार पद्धतीने दाखवले आहे.

नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. indian_commenthub नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला असून, हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

  • एका युजरने लिहिले, "जेव्हा पुरुष प्रेमात असतो."

  • दुसऱ्याने लिहिले, "आता मित्र वाईट वाटतोय, पण जेव्हा ब्रेकअप होईल, तेव्हा तोच मित्र कामाला येईल."

  • तिसऱ्याने गंमतीत लिहिले, "मुली नेहमीच बरोबर असतात."

  • तर, एकाने थेट 'माझ्या मित्राची कहाणी' असे लिहून व्हिडिओला आपल्या मित्रासोबत शेअर केले.

हा व्हिडिओ केवळ मनोरंजकचं नाहीतर आजच्या तरुणाईच्या मानसिकतेवर एक हलकी-फुलकी टिप्पणीही करतो. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मजेशीर आणि Relatable व्हिडिओ खूप पसंत केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT