Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

Viral Video Of Woman: सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या हव्यासापोटी लोक आपला जीव धोक्यात घालून रील (Reels) बनवत आहेत.
Viral Video Of Woman
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video Of Woman: सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या हव्यासापोटी लोक आपला जीव धोक्यात घालून रील (Reels) बनवत आहेत. कोणी डोंगराच्या टोकावर स्टंट करत व्हिडिओ बनवतो, तर कोणी ट्रेनच्या छतावर चढून 'सुपरहिरो' बनतो. पण सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. एका सुक्या झाडाच्या (Trees) फांदीवर बसलेली एक महिला स्वतःला 'झाडांची राणी' (Queen of Trees) म्हणत आहे, तिचा हा व्हिडिओ पाहून लोक पोट धरुन हसत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

झाडावर 'महारानी'चा जलवा

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ एका डोंगराळ भागात चित्रित करण्यात आला आहे. यामध्ये एका सुक्या झाडाच्या फांदीवर लाल साडी नेसून एक महिला (Women) मोठ्या नाटकी अंदाजात बसलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती अत्यंत आत्मविश्वासपूर्ण डायलॉगबाजी करताना दिसते. ती म्हणते, "मी झाडांची राणी आहे आणि माझी कहाणी इतक्या लवकर संपणार नाही. सेनापती, जाऊन राज्यात घोषणा करा की झाडांची फक्त एकच राणी आहे, ती म्हणजे महाराणी. झाडांवर कुणीही आपला हक्क सांगू शकत नाही, त्यावर फक्त माझा हक्क आहे. त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे."

या 'झाडांच्या राणी'चा आत्मविश्वास, तिची डायलॉगबाजी आणि फांदीवर बसण्याची तिची शैली पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Viral Video Of Woman
Tamannaah Bhatia: "थुंकी लावा,पिंपल्स घालवा" तमन्ना भाटियाचा विचित्र सौंदर्य मंत्र; सोशल मीडियावर Video Viral

नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

हा व्हिडिओ @miss_pooja_official_887 नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दीड कोटींहून अधिक लोकांनी पाहिला असून 6 लाखांहून अधिक लाईक्स त्याला मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

एका युजरने लिहिले की, "ब्रांच मॅनेजरचे प्रमोशन झाले!" दुसऱ्याने लिहिले की, "पुढच्या 'बाहुबली' मध्ये तुलाच कास्ट करतो!" तिसऱ्याने लिहिले की, "हे लोक कुठून येतात?" तर चौथ्याने चिंतेने म्हटले की, "जर झाड तुटले तर काय होईल याचा विचार करा."

हा व्हिडिओ जरी मनोरंजक असला, तरी व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा एकदा यातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com