Margao Market: मांजरीची पिल्ले मार्केटमध्ये सोडण्याचा प्रयत्न, दाम्पत्याला पकडले रंगेहाथ; मडगावात केली कारवाई

Margao: मडगाव येथील एसजीपीडीए मार्केटमध्ये मांजरीची दोन पिल्ले एका पोत्यात बांधून ती सोडून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले.
Margao Market
Margao MarketDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव येथील एसजीपीडीए मार्केटमध्ये मांजरीची दोन पिल्ले एका पोत्यात बांधून ती सोडून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले. दक्षिण गोवा प्राणी छळ प्रतिबंधक संस्थेच्या कार्यकारी सचिव व्हर्जिनिया सिमोईस यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास मार्केटमधील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सिमोईस यांना या घटनेची माहिती दिली. संबंधित दाम्पत्य मार्केटमध्ये आले होते. त्यांनी मांजरीची दोन पिल्ले एका पोत्यात घट्ट बांधून आणली होती आणि ती तेथे टाकून देण्याच्या प्रयत्नात होते.

Margao Market
Goa Opinion: महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो'; गावांतील संगीत संमेलनांतून आम्ही घडलो..

सिमोईस यांनी तातडीने तेथे धाव घेत त्यांना रोखले. त्यांना हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यावर त्या दाम्पत्याने यात काहीच चुकीचे नसल्याचा दावा करत, आम्ही फक्त त्यांना सोडून देत आहोत, असे सांगितले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com