Vice President Kamala Harris Dainik Gomantak
ग्लोबल

Kamala Harris: हमासची क्रूरता जगासमोर मांडणाऱ्या ओलिसाची कमला हॅरिस यांनी घेतली भेट; 'रक्ताने माखलेले महिलांचे फोटो पाहिले'

Manish Jadhav

Vice President Kamala Harris: गाझामध्ये इस्रायली सैन्याचा कहर सुरुच आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गाझा आणि राफाह शहरांमध्ये विध्वंस पाहायला मिळत आहे. सर्व प्रयत्न करुनही हे युद्ध थांबत नाहीये. दरम्यान, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सोमवारी एका इस्रायली वकिलाची भेट घेतली, त्याच वकिलाने गाझामध्ये ओलिस असताना लैंगिक छळ झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान हमासने त्याच्या घरातून अपहरण केलेल्या अमित सौसाना यांच्याशी आम्ही बाचचित केली. खरे तर, सौसनाने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सविस्तररित्या आपबिती सांगितली. नोव्हेंबरमध्ये युद्धविरामदरम्यान कैदेत असताना त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

'रक्ताने माखलेले महिलांचे फोटो पाहिले'

उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इस्रायली महिलांचे रक्ताने माखलेले फोटो पाहिले. त्यानंतर त्यांना नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी सामूहिक बलात्कारासारख्या घटना घडवल्याचं समजलं. त्यांनी पुढे सांगितले की, महिला (Women) नग्न अवस्थेत आढळल्या, त्यांचे हात पाठीमागे बांधलेले होते आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

दरम्यान, हॅरिस यांनी इस्रायल-हमास युद्धात लैंगिक हिंसाचाराचे तपशीलवार आरोप केले. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन गाझामधील लढाई थांबवण्यासाठी आणखी एक युद्धविराम करण्याचा प्रयत्न करतायेत. हॅरिस यांनीही हमासला अमेरिकेने पाठिंबा दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली. हॅरिस म्हणाल्या की, त्यांनी इस्रायली ओलिसांकडून कैदेत असताना पाहिलेल्या आणि ऐकलेल्या कहाण्या ऐकल्या आहेत.

हमासने आरोप फेटाळून लावले आहेत

तथापि, हमासने (Hamas) 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान किंवा त्यानंतर ओलीस ठेवलेल्या लोकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फेटाळून लावला. परंतु मार्चमध्ये जारी करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि इतर क्रूर आणि अमानवी वागणूक देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT