Israel Hamas War: इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान नेतन्याहू यांना मोठा झटका; इस्रायलचे वॉर मंत्री गँट्झ यांचा राजीनामा

Israeli Minister Benny Gantz: इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. दोघेही मागे हटायला तयार नाहीयेत.
israeli minister benny gantz
israeli minister benny gantzdainik gomantak

Israeli Minister Benny Gantz: इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. दोघेही मागे हटायला तयार नाहीयेत. इस्त्रायल अधिक आक्रमकपणे हमासशासित गाझासह अनेक शहरांवर हल्ले करत आहे. नुकताच इस्त्रायलने राफाह शहरावर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्याप्रमाणात निष्पाप लोक मारले गेले होते. हल्ल्यानंतर इस्त्रायलने दावा केला होता की, त्यांनी हमासचे दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते त्या ठिकाणांना लक्ष्य केले. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलचे वॉर कॅबिनेट मंत्री बेनी गँट्झ यांनी रविवारी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. पंतप्रधान नेतन्याहू आपल्याला विजयाकडे वाटचाल करण्यापासून रोखत आहेत, असे गँट्झ म्हणाले.

तथापि, Gantz यांच्या बाहेर पडण्याचा नेतन्याहू सरकारला कोणताही धोका नाही. परंतु नेतन्याहू यांना हा मोठा झटका मानला जात आहे. यामुळे नेतन्याहू कट्टरपंथीयांवर अवलंबून राहतील, ज्यामुळे गाझा युद्धाचा अंत होणार नाही आणि लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाशी संघर्ष आणखी वाढू शकतो.

israeli minister benny gantz
Israel Hamas War: गाझातील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा मोठा हल्ला; 94 पॅलेस्टिनी ठार, 200 हून अधिक जखमी

नेतन्याहू यांना अल्टिमेटम दिला

गेल्या महिन्यात गँट्झ यांनी नेतन्याहू यांना गाझासाठी स्पष्ट रणनीती तयार करण्यासाठी 8 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, जिथे नेतन्याहू यांनी त्यांचा तो अल्टिमेटम लगेचच फेटाळला होता.

रविवारी गँट्झ यांनी सांगितले की, नेतन्याहू यांच्या धोरणात्मक निर्णयांवर केवळ अन् केवळ राजकारण होत आहे. इस्त्रायली ओलिस गाझामध्ये असताना आणि सैनिक तिथे लढत असताना आपण तेथून माघार घेणे हे कदापि योग्य ठरणार नाही. नेतन्याहू आम्हाला खऱ्या विजयाकडे वाटचाल करण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे आज आपण जड अंतःकरणाने सरकारमधून बाहेर पडत आहोत.

गँट्झ पुढे म्हणाले की, ही युद्धभूमी सोडण्याची वेळ नाही. त्यांनी युद्धभूमीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास ते एका पक्षाचा पाठिंबा गमावतील, ज्याने गाझा युद्धाच्या आठ महिन्यांनंतर वाढत्या राजनैतिक आणि देशांतर्गत दबावाच्या वेळी इस्रायल आणि परदेशात सरकारला (Government) पाठिंबा दिला.

दरम्यान, संसदेच्या 120 जागांपैकी 64 जागांवर त्यांच्या युतीचे नियंत्रण असताना नेतन्याहू यांना आता अति-राष्ट्रवादी पक्षांच्या राजकीय पाठिंब्यावर अधिक अवलंबून राहावे लागेल, ज्यांच्या नेत्यांनी युद्धापूर्वीच अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली होती.

israeli minister benny gantz
Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

परदेशात इस्रायलची स्थिती

अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘गँट्झ इस्रायलच्या शत्रूंना हवे ते देत आहे.’ तर दुसरीकडे, त्यांच्या जाण्याने परदेशात इस्रायलच्या (Israel) स्थितीवर परिणाम होईल याची काळजी आहे का असे विचारले असता, गँट्झ म्हणाले की, गॅलंट आणि नेतन्याहू दोघांनाही काय करण्याची आवश्यकता आहे हे माहित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com