Israel Hamas War: ‘’इस्रायली सैन्याने आगेकूच केल्यास ओलिसांना गोळ्या घाला’’; हमासने दिला अल्टिमेटम

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांना लक्ष्य करत आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांना लक्ष्य करत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. हमास जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी शपथ इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. दरम्यान इस्त्रायल अधिक आक्रमकपणे हल्ले करत आहे. यातच आता हमासकडून इस्त्रायलला अल्टिमेटम देण्यात आला आहे.

दरम्यान, इस्त्रायल हमासच्या (Hamas) ठिकाणांना उद्धवस्त करत गाझामध्ये आगेकूच करत आहे. हे पाहता आता हमासने ताब्यात असणाऱ्या इस्त्रायली ओलिसांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आधीच अस्थिर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देत न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्त्रायलने आगेकूच सुरु ठेवल्यास गाझामध्ये बंदिवासात असलेल्या ओलिसांना ठार मारण्याचे आदेश हमासच्या लिडरने दिले आहेत. अलीकडेच इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) गाझामधील नुसेरात छावणीतील चार ओलीसांची सुटका केली. त्याचवेळी, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तीन ओलीस ठार झाल्याचा हमासचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. या मृत्यूंना हमासचे दहशतवादी जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Israel Hamas War
Israel Hamas War: इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान नेतन्याहू यांना मोठा झटका; इस्रायलचे वॉर मंत्री गँट्झ यांचा राजीनामा

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर (Israel) हल्ला केल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी 200 हून अधिक लोकांना आपल्या ताब्यात घेतले. ते त्यांना गाझामध्ये घेऊन गेले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलने हमासवर हल्ले सुरु केले. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्त्रायली ओलिसांची जोपर्यंत हमास सुटका करत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, अशी शपथ घेतली. इस्रायलने आतापर्यंत सात ओलिसांची सुटका केली. तर आतापर्यंत अनेकांचा संघर्ष दरम्यान किंवा अपहरणकर्त्यांच्या हातून मृत्यू झाला.

Israel Hamas War
Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

यूएनमध्ये युद्धविरामाचा ठराव

दरम्यान, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कॉन्सिल (UNSC) ने सोमवारी गाझामधील युद्धविराम योजनेला पाठिंबा देणारा ठराव मंजूर केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सादर केलेला ठराव युद्धविराम आणि ओलीसांची सुटका करण्याचे आवाहन करतो. यात सहभागी असलेल्या सर्व पक्षांना "विलंब न करता आणि कोणत्याही अटींशिवाय त्याच्या अटी पूर्णपणे अंमलात आणण्याचे" आवाहन करतो. इस्रायलने युद्धविराम योजनेला सहमती दर्शवली आणि हमासला तसे करण्याचे आवाहन केले, असे ठरावात म्हटले आहे. हमासने यूएनएससीच्या मताचे “स्वागत आहे” असे म्हणत प्रत्युत्तर दिले. असे असूनही, शांततेच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. हमासकडून मागणी केली की, कोणत्याही युद्धविराम कराराने संघर्ष कायमस्वरुपी समाप्त होण्याची हमी दिली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com