USA President Election  Dainik Gomantak
ग्लोबल

America valiance: डोनाल्ड ट्रम्प टिव्ही पाहण्यात मशगुल, 'हिंसाचार रोखला नाही

Donald Trump: ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा आणि निवडणूक संपल्याची घोषणा करावी

दैनिक गोमन्तक

President: अमेरिके मध्ये राष्ट्रपती निवडणुकी वेळी उसळलेल्या हिंसेचा तपास करणाऱ्या समितीने एक विडीओ प्रसिद्ध केला आहे.हा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे,या व्हिडीओ मध्ये माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या साठी तयार करण्यात आलेल्या भाषणाचे काही मुद्दे आहेत. तपास करणाऱ्या समितीचा दावा आहे की ट्रम्प यांनी हिंसा रोकण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. उलट व्हाईट हाउस मध्ये बसून ते घटना Tv वर पाहत होते.

तपास समितीच म्हणन आहे की माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या विनंत्या फेटाळून संसद भवनात 6 जानेवारीला घडलेला हिंसाचार थांबवण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या आक्रमक ट्विटने 'आगीत तेल टाकण्याच' काम केले.

ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा आणि निवडणूक संपल्याची घोषणा करावी यासाठी भाषणाची रचना करण्यात आली होती. याउलट त्याने आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला. समितीने सांगितले की, ट्रम्प आपल्या भाषणात निदर्शकांना परत येण्याचे आवाहन करणार होते, परंतु त्यांनी निवडणुकीत हेराफेरीचे दावे केले.

रिपब्लिकन पार्टीचे सदस्य पण ट्रम्प यांचे टीकाकार एडम किंजिंगर म्हणाले, "अध्यक्ष कारवाई करण्यात अयशस्वी झाले नाहीत,तर त्यांनी कारवाई नकरण्याचे ठरवले.

चौकशी समितीने हिंसाचाराच्या दिवसाचा मिनिटा मिनिटाला तपशील दिला आहे. वॉशिंग्टनमध्ये गर्दी जमवण्यासाठी त्याने काय केले हे सांगितले जाते. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाचे सेवानिवृत्त सार्जंट मार्क रॉबिन्सन म्हणाले की, ट्रम्प यांना त्यांच्या समर्थकांच्या गर्दीत किती लोक शस्त्रे घेऊन जात आहेत हे चांगलेच ठाऊक होते, परंतु त्यांना त्याची पर्वा नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT