Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाविरोधात लढण्यासाठी आता अमेरिका युक्रेनला देणार 'हा' बॉम्ब

क्षणात सर्व उद्धवस्त करण्याची क्षमता, ख्रिसमसकाळातही रशिया युद्ध सुरूच ठेवणार

Akshay Nirmale

Russia- Ukraine War: गेले जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमधील युद्ध धगधगत आहे. आता ख्रिसमसकाळातही रशियाला युद्धविराम नको आहे, शिवाय अमेरिकेच्या एका निर्णयाने हे युद्ध आणखी लांबणार आहे. युद्धात अमेरिका सुरुवातीपासूनच युक्रेनला मदत करत आहे. आणि आता अमेरिकेने युक्रेनला एक संहारक बॉम्ब देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिका युक्रेनला प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे किट पाठवणार आहे. या अद्ययावत इलेक्ट्रॉनिक उपकरण किटला 'स्मार्ट बॉम्ब' असेही म्हणतात. त्याच्या मदतीने युक्रेनचे सैनिक रशियाच्या लष्करी तळांना आरामात लक्ष्य करू शकतो. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या स्मार्ट बॉम्बमध्ये जीएपएस प्रणालीदेखील आहे. त्यामुळे लक्ष्यभेद करणे सोपे जाते. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकारच्या शस्त्रांवर बसवता येते. या उपकरणाला पेंटागॉन जॉईंट डायरेक्ट अटॅक मुनिशन किंवा (JDAM) म्हणतात. लढाऊ विमानांवर हे उपकरण अधिक वापरले जाते.

तथापि, युक्रेनला स्मार्ट बॉम्ब देण्याबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. युक्रेनियन हवाई दल प्रामुख्याने सोव्हिएत काळातील मिग जेट विमानांवर अवलंबून आहे. स्मार्ट बॉम्बला स्मार्ट मिसाईल असेही म्हणतात. हा बॉम्ब विशिष्ट लक्ष्यावर अचूक हल्ला करतो.

दरम्यान, आधीच या युद्धाला दहा महिन्यांचा कालावधी होत आहे. युद्धाच्या सुरवातीला युक्रेनवर रशिया सहज मात करून काही दिवसांतच युद्ध जिंकेल, असे वाटले होते. पण युक्रेनने रशियाला खंबीर विरोध केला आहे. आत्तापर्यंत मोठे नुकसान होऊनही युक्रेनने रशियासमोर नांगी टाकलेली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमिर झेलेन्स्की यांनी शेवटपर्यंत रशियाला शरण जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. खरेतर यामुळे बलाढ्य समजल्या जात असलेल्या रशियाचीही जगभर नाचक्की झाली आहे. शिवाय जगभरातून युक्रेनला सहानुभूती मिळत आहे. युक्रेनच्या कडव्या प्रतिकारामुळेच चिडलेल्या रशियाकडून अनेकदा एकाच दिवसात सतत क्षेपणास्त्र हल्ले केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

CBI अधिकारी बनून फसवणूक! बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 32 कोटींचा गंडा, मानसिक त्रासाने बिघडली महिलेची तब्येत

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT