China At LAC: तवांगसह डोकलाम, लडाखमध्ये चीनच्या तयारीने वाढणारभारताची चिंता...

पँगाँग सरोवराजवळ पुलाचे बांधकाम, पायाभुत सुविधांची वेगाने उभारणी
 India China LAC Issue
India China LAC Issue Dainik Gomantak
Published on
Updated on

China At LAC: डोकलाम आणि गलवाननंतर चीनचा तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला असली तरी चीन एलएसीवरील पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ करत आहे. उपग्रह छायाचित्रांमधून ते स्पष्ट झाले आहे. लडाखमध्ये, पँगाँग तलावाजवळ एक पूल बांधला जात आहे. तिथे चीन सैनिकांसाठी आश्रयस्थान बनवत आहे. याशिवाय डोकलाममध्ये अवैध गावे उभारली जात आहेत. एकुणच तवांग, डोकलाम, पँगाँग अशा ठिकाणी चीनकडून वेगाने पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

 India China LAC Issue
America Ban TikTok: चीनी हेरगिरीच्या संशयाने अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'या' अ‍ॅपवर बंदी

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे नुकतेच चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. तिथेही चीनच्या हालचाली दिसून आल्या आहेत. लडाखमधील पँगाँग तलावाजवळ फिंगर 8 पर्यंत भारत आपले अधिकार क्षेत्र मानतो, तर चीन फिंगर 4 पर्यंत दावा करतो. संपूर्ण LAC वर, भारत आणि चीनमध्ये फक्त पँगाँग तलावावर जल सीमा आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये भारत-चीन सैन्याने माघार घेतली.

नुकतेच उपग्रह छायाचित्रांमधून हे उघड झाले आहे की चीन माघार घेत असूनही तेथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. या छायाचित्रांमध्ये 40 बाय 30 मीटरच्या निवाऱ्यासारखी रचना शस्त्रांसाठी बनवली आहे. लष्करी वाहने ठेवण्यासाठी काही निवारेही बांधले आहेत. पँगाँग लेकच्या फिंगर फोरपासून सुमारे 6.5 किमी अंतरावर एक मुख्यालय आणि सैनिकांसाठी निवाराही बांधला आहे. सैनिकांच्या आश्रयस्थानाच्या पूर्वेला सुमारे 2.5 किमी अंतरावर एक बांधकाम साइट आहे, ज्यामध्ये रडार, सिग्नल किंवा अँटेना संरक्षित करणारा रेडोम आहे. याशिवाय चीन पॅंगॉन्ग सरोवरावर दोन मजली पूलही बांधत आहे, ज्यामुळे सरोवराच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील टोकांमधील अंतर कमी होईल.

 India China LAC Issue
Nonuplets: एकाच वेळी 9 मुलांना जन्म देणाऱ्या 'या' महिलाचा नवा रेकॉर्ड!

2020 मध्ये रिक्त झालेल्या जागेवर आता विभाग स्तरावरील मुख्यालय आणि सैनिकांसाठी निवारा आहे. चिंतेची बाब म्हणजे चीनने ज्या ठिकाणाहून सैन्याला माघार घेण्यास सांगितले होते, त्या ठिकाणापासून ही सर्व संरचना थोड्याच अंतरावर आहे. रेडोम साइटजवळ अजूनही बांधकाम सुरू आहे आणि उपग्रह प्रतिमांमध्ये दोन टॉवर आणि जोडणारा रस्ता देखील स्पष्टपणे दिसत आहे.

डोकलाम वाद संपल्यानंतर चीनने सीमेवर पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत, जड शस्त्रे ठेवण्यासाठी बोगदे बांधले आहेत आणि सीमेवर आपली ताकद दुप्पट केली आहे. सीमेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर एक पूलही बांधला जात आहे, ज्यामुळे चकमक होऊ शकते. चीन ट्राय जंक्शनपासून 9 किमी अंतरावर आपली उपस्थिती वाढवत आहे. 2020 मध्ये येथे स्थायिक झालेले पांगडा गाव 2021 मध्ये आणखी वाढले आणि अलीकडे दक्षिणेकडे अधिक विस्तार दिसून आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com