Nonuplets: एकाच वेळी 9 मुलांना जन्म देणाऱ्या 'या' महिलाचा नवा रेकॉर्ड!

New Born Baby: या महिलेने मोरोक्कोमध्ये या मुलांना जन्म दिला. एकाच वेळी जन्मलेल्या आणि जिवंत असल्याबद्दल या मुलांची नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली.
Women
WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Woman Gave Birth To Nine: काही काळापूर्वी एकाच वेळी नऊ मुलांना जन्म देऊन प्रसिद्धीझोतात आलेली एक महिला आणि तिचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या महिलेने मोरोक्कोमध्ये या मुलांना जन्म दिला. एकाच वेळी जन्मलेल्या आणि जिवंत असल्याबद्दल या मुलांची नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली. आता ही सर्व मुले 19 महिन्यांची आहेत.

विक्रमी 19 महिन्यांनंतर घरी परतली!

वास्तविक, हलिमा असे या महिलेचे नाव आहे. हलिमा ही माली येथील रहिवासी असून ती प्रसूतीसाठी मालीहून मोरोक्कोला गेली होती. मुलांचा जन्म मे 2021 मध्ये मोरोक्कोमध्ये झाला होता. आणि आता ती या सर्व मुलांसह मालीला परतत आहे. म्हणजेच, इतक्या मुलांची प्रसूती झाल्यानंतर ती तब्बल 19 महिन्यांनी घरी परतली आहे.

Women
India Global Forum: भारतीय नोकरशाही आणि उद्योग; काय म्हणाले ग्लोबल फोरममध्ये जाणकार

मुले 5 मुली 4 मुले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच 13 डिसेंबर रोजी सर्व 9 मुले आई हलिमा किसे आणि वडील अब्देलकादर अरबे यांच्यासोबत मालीची राजधानी बामाको येथे पोहोचली आहेत. नऊ मुलांमध्ये 5 मुली आणि 4 मुले आहेत. मुलींची नावे कादिदिया, फतौमा, हवा, एडमा, ओमू, तर मुलांची नावे मोहम्मद 6, ओमर, इल्हादजी आणि बाह अशी आहेत.

Women
Global Forum on India-UAE: भारत आणि दुबईत ऐतिहासिक संबंध; UAE मध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची महत्वाची बैठक

सरकारकडूनही मदत मिळाली!

या कुटुंबाला माली सरकारकडून आर्थिक मदतही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा ही मुले जन्माला आली तेव्हा त्यांचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम दरम्यान होते. प्री-मॅच्युअर असल्याने या सर्व मुलांचा पहिला महिना रुग्णालयात घालवला गेला, त्यानंतर सर्व मुलांना मोरोक्कोमधील एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी हलवण्यात आले. बराच काळ ही मुले या दोन देशांत चर्चेचा विषय राहिली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com