America Strikes Qeshm Island Dainik Gomantak
ग्लोबल

America Strikes Qeshm Island: केशम बेटावरील स्फोटांनी हादरले इराण! मतदानाच्या दिवशीच अमेरिकेकडून लष्करी कारवाई; 'आत्मरक्षणासाठी' हल्ला केल्याचा दावा

US Strikes Iran Qeshm Island Strait Of Hormuz: अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन लष्कराने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' या मोक्याच्या सागरी मार्गावरील इराणच्या काही लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले.

Manish Jadhav

America Strikes Qeshm Island: अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन लष्कराने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' या मोक्याच्या सागरी मार्गावरील इराणच्या काही लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या लष्करी कारवाईची माहिती देताना हा केवळ एक 'संरक्षणात्मक' हल्ला असल्याचे स्पष्ट केले. इराणच्या 'केशम' बेटावर भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या इराणी माध्यमांनी दिल्यानंतर अमेरिकेकडून या हल्ल्याबाबत अधिकृत वक्तव्य आले.

विशेष म्हणजे, आज अमेरिकेत अत्यंत महत्त्वाच्या 'मध्यावधी निवडणुकांसाठी' मतदान पार पडत आहे. अशा महत्त्वाच्या दिवशीच इराणवर (Iran) झालेल्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकन प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणी सैन्य अमेरिकन मालमत्तांना लक्ष्य करण्यासाठी जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करत होते. अमेरिकन सैन्याने याच क्षेपणास्त्र यंत्रणांना आणि त्यांच्या तळांना अचूक निशाणा बनवून प्रत्युत्तराखल कारवाई केली. तथापि, मतदानाच्या अगदी काही तास आधी केलेल्या या लष्करी कारवाईमुळे ट्रम्प प्रशासनाच्या रणनीतीवर अनेक राजकीय प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इराणसोबतचा संघर्ष वाढल्यास अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडतील, ज्याचा थेट फटका रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत बसू शकतो.

दुसऱ्या बाजूला, लष्करी हल्ले सुरु असतानाच अमेरिकेने संवादाचा मार्गही खुला ठेवला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी इराणसोबत चर्चेच्या माध्यमातून कराराची शक्यता असल्याचे सूचक विधान केले. त्यांनी याप्रकरणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असून, दोन्ही देश चर्चेद्वारे तोडगा काढू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. एका बाजूला युद्ध आणि दुसऱ्या बाजूला शांतता वार्ता, अशा ट्रम्प प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेसमध्ये उमेदवारी विकण्याची जुनी खोड'; चर्चिल आलेमाव यांचा गंभीर आरोप, विजयाबाबतही इशारा

Goa Protest: वेलिंगकरविरोधी आंदोलनप्रकरणी आठजणांचे बाँड सादर; म्हणाले, 'कितीही गुन्हे दाखल करा, मागे हटणार नाही'

Goa Politics: आरजीतील संघर्ष पेटला! मनोज परब गट निवडणूक लढवणार; 18 मतदारसंघांत गटसमित्यांची पुनर्रचना

Malavya Rajyog 2026: धनत्रयोदशीचा महासंयोग! मालव्य राजयोग ठरवणार 'या' राशींचे भविष्य; बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ

खरी कुजबुज: 'आरजी'च्या दोन्ही बाजू आमने-सामने

SCROLL FOR NEXT