Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Iran Uses Sholay Thakur Meme to Mock UN: भारतातील इराणच्या दूतावासाने आंतरराष्ट्रीय संघर्षादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादित आणि हतबल भूमिकेवर ताशेरे ओढण्यासाठी अतिशय अनोख्या मार्गाचा अवलंब केला.
Iran Uses Sholay Thakur Meme to Mock UN
Iran Torlls UNDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US Iran Conflict UN Role Critique: भारतातील इराणच्या दूतावासाने आंतरराष्ट्रीय संघर्षादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादित आणि हतबल भूमिकेवर ताशेरे ओढण्यासाठी अतिशय अनोख्या मार्गाचा अवलंब केला. सध्या मध्य पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण असताना, इराणने थेट बॉलिवूडच्या प्रसिद्ध विनोदी आणि संवादात्मक शैलीचा आधार घेत युएनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 'एक्स'वर शेअर केलेल्या एका मीमच्या माध्यमातून त्यांनी ही राजकीय टीका केली.

इराणच्या या मीममध्ये युएनच्या केवळ कागदोपत्री असणाऱ्या आदर्श प्रतिमेत आणि प्रत्यक्ष जगातील गंभीर संकटांमधील त्याच्या मर्यादित कार्यक्षमतेत मोठा विरोधाभास दाखवण्यात आला. या पोस्टमधील पहिल्या भागात मार्वलच्या 'डॉक्टर स्ट्रेंज' या पात्राचे अनेक हात दाखवून त्याला 'शाळेच्या पुस्तकांनुसार युएन' असे संबोधले गेले. तर दुसऱ्या भागात महानायक अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार अभिनीत 'शोले' या क्लासिक चित्रपटातील 'ठाकुर बलदेव सिंह' यांचे पात्र दाखवण्यात आले, जे परिस्थितीपुढे लाचार असतात. या भागावर 'प्रत्यक्ष वास्तवातील युएन' असे उपरोधिक कॅप्शन देण्यात आले.

Iran Uses Sholay Thakur Meme to Mock UN
US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

या व्हिज्युअल तुलेनेमागचा मुख्य उद्देश हा दाखवणे होता की, युएनला अनेक जागतिक संकटांचे निवारण करण्यासाठी सक्षम मानले जात असले, तरी प्रत्यक्षात वास्तवात हस्तक्षेप करण्याची त्यांची ताकद आणि अधिकार अत्यंत मर्यादित आहेत. जरी दूतावासाने या पोस्टमध्ये युएनच्या कोणत्याही विशिष्ट ठरावाचा किंवा कारवाईचा थेट उल्लेख केला नसला, तरी ताकदवान देशांमधील संघर्षांवर नियंत्रण ठेवण्याच्या या जागतिक संस्थेच्या कार्यक्षमतेवर जगभरात सुरु असलेल्या चर्चेच्या केंद्रबिंदूवर हे मीम नेमके बोट ठेवते.

Iran Uses Sholay Thakur Meme to Mock UN
Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

विशेष म्हणजे, ही पोस्ट इराणच्या (Iran) बदलत्या डिजिटल मुत्सद्देगिरीचा एक मोठा भाग दर्शवते. 'इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक डायलॉग'च्या संशोधनानुसार, अमेरिका-इराण संघर्ष सुरु झाल्यानंतर इराणच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरील एंगेजमेंटमध्ये अभूतपूर्व वाढ झाली. तेहरान आता कठीण आणि गुंतागुंतीचे भू-राजकीय संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मीम्स, विनोद, पॉप कल्चर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलेल्या आशयाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. या पद्धतीला 'मीम-ड्रिव्हन स्टेटक्राफ्ट' असे म्हटले जात असून, याद्वारे कूटनीतिक संदेश जगभरात झपाट्याने आणि प्रभावीपणे पोहोचवले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kunal Thakur Disability Achievements
US Iran talks three hour meeting
America Strikes Iranian Oil Tankers:
Iran New Hydrocarbon Natural Gas Discovery
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com